सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:58 AM2021-10-23T05:58:57+5:302021-10-23T05:59:57+5:30

तरुणांनी निरोगी जीवनशैली आत्मसात करावी

Celebrities should pay attention to the quality of the product says gulshan grover | सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर

सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर

Next

नवी दिल्ली :  उत्पादनाचे समर्थन करतांना किंवा जाहिरात करण्याआधी नामांकित व्यक्तींनी  त्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवे, केवळ नावासाठी उत्पादनाशी संबंध जोडू नये, असे मत अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी व्यक्त केले.

गुलशन ग्रोवर हे बॉलिवूडमध्ये ‘बॅडमॅन’ नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या  फिटनेसचे रहस्य उघड करताना सांगितले की,  दररोज एक तास व्यायामासोबत योग्य आहार घेणे जरुरी आहे.  दिल्लीत बॅडमॅन मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्ट लाँच करताना गुलशन ग्रोवर बॅडमॅनच्या अंदाजात दिसले.  यावेळी ते म्हणाले की, चांगल्या आरोग्यासोबत आकर्षक दिसणेही जरुरी आहे. भारतीय युवकांत याचा अभाव दिसतो. डॉ. आर्थाे, रुप मंत्रा, आय मंत्रा यासारखे लोकप्रिय प्रॉडक्ट लाँच करणाऱ्या ‘दिविसा हर्बल केअर’सोबत  व्यावसायिक सुरुवात करताना ते म्हणाले की, मी आजही  चाळीशीच्या तरुणासारखा समजतो. 

प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद -डॉ. संजीव जुनेजा 
यावेळी दिविसा हर्बल केअरचे संस्थापक डॉ. संजीव जुनेजा यांनी सांगितले की, आमच्या दुसऱ्या उत्पादनांप्रमाणे बॅडमन रेंजच्या सर्व मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्टलाही उत्साहजनक प्रतिसाद मिळाला आहे. 
बॉलिवूड आणि दुसऱ्या क्षेत्रातील  नामवंत व्यक्तींनी या प्रॉडक्टचा वापर केला असून, सर्वांनी या सर्व प्रॉडक्टच्या गुणवत्तेची प्रशंसा केली.  नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले बॅडमन मेन्स ग्रूमिंग रेंजचे प्रॉडक्टस् ‘मेन इन इंडिया’ आहेत. 
तरुणाईची गरज ध्यानात घेऊनच ही प्रॉडक्टस् तयार करण्यात आली आहेत. भारतानंतर  निश्चितपणे हे प्रॉडक्टस् जागतिक बाजारातही उतरवले जातील.

Web Title: Celebrities should pay attention to the quality of the product says gulshan grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.