CBIvsCBI: 'अस्थाना आपला माणूस, वैर घेऊ नका!' लाचेचा तपशील फोनवरील संभाषणातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:54 AM2018-10-31T05:54:54+5:302018-10-31T06:51:36+5:30

सीबीआयमधील वादात अस्थाना यांच्या लाच प्रकरणाची चौकशी करणारे अजय बस्सी यांनी आपल्या पोर्ट ब्लेअरमधील बदलीला आव्हान देणारी याचिका सादर करताना अनेक तपशील न्यायालयासमोर ठेवला. त्यात काहींची फोनवरील संभाषणे व मेसेजेस यांचाही समावेश आहे.

CBIvsCBI: 'Asthana is your man, do not take vengeance!' Details of the bill exposed from the phone conversation | CBIvsCBI: 'अस्थाना आपला माणूस, वैर घेऊ नका!' लाचेचा तपशील फोनवरील संभाषणातून उघड

CBIvsCBI: 'अस्थाना आपला माणूस, वैर घेऊ नका!' लाचेचा तपशील फोनवरील संभाषणातून उघड

Next

- हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारी माहिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. सीबीआयमधील वादात अस्थाना यांच्या लाच प्रकरणाची चौकशी करणारे अजय बस्सी यांनी आपल्या पोर्ट ब्लेअरमधील बदलीला आव्हान देणारी याचिका सादर करताना अनेक तपशील न्यायालयासमोर ठेवला. त्यात काहींची फोनवरील संभाषणे व मेसेजेस यांचाही समावेश आहे. त्यापैकी काही माहिती पुढीलप्रमाणे...

अस्थाना आपला माणूस आहे, त्याच्याशी वैर घेऊ नका... दुबईतील व्यावसायिक सोमेश प्रसाद यांनी आपल्या सासऱ्यांना हे सांगितले. ते त्या वेळी सतीश बाबू साना यांच्याकडे पैसे आणायला गेले होते. ती रक्कम अस्थाना यांना द्यायची होती. साना यांच्यावरील सीबीआयची कारवाई कमकुवत व्हावी, यासाठी सानाना सीबीआयच्या कोणाची तरी मदत हवी होती.

सोमेश प्रसाद यांचे सासरे दिल्लीतील नामवंत वकील काहीसे घाबरले होते, पण सोमेश प्रसाद यांनी त्यांना सांगितले... अस्थाना आपला माणूस आहे. जानेवारी २0१८ मध्ये फोनवरील संभाषणावर नजर ठेवली जात असताना व्हॉट्सअ‍ॅपवर एक संदेश आढळला... आपण त्यांच्याशी (अस्थाना) पंगा घेऊ शकत नाही. हे सोमेश प्रसाद सांगत होते सतीश साना यांना.

यापैकी कोणालाही आपल्या संभाषणावर सीबीआयची नजर आहे, हे माहीत नव्हते. सोमेश प्रसाद दुबईत बसून, योजनेवर लक्ष ठेवून होते. योजना पूर्णत्वास आणण्यासाठी त्यांचा भाऊ महेश प्रसाद दिल्लीत होता. सीबीआयच्या कारवाईतून सुटण्यासाठी साना याने त्यांची मदत मागितली होती. वर्मा यांनी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीबीआयमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बस्सी यांना नेमले होते.

अजय बस्सी यांनी बदलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. अस्थाना यांच्यावरील आरोप गंभीर असताना, चौकशी नीट होऊ नये, म्हणूनच आपली बदली केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.बस्सी यांनी काही पुरावेही सादर केले.

अस्थाना यांनी सानाच्या निमित्ताने व्यावसायिकामार्फत रक्कम घेतल्याचे सिद्ध करण्यासाठी बस्सी यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेश व कॉल याचा तपशील न्यायालयाला दिला. बदलीच्या विरोधातील याचिका तातडीने ऐकून घ्यावी, अशी विनंतीही बस्सी यांनी केली. त्यावर तपासून पाहू, असे त्यांना सांगितले.

बस्सी यांनी प्रत्यक्ष पुरावा दिला नाही. मात्र सोमेश प्रसाद व अस्थाना, अस्थाना व महेश प्रसाद यांचे तसेच या प्रकरणातील इतरांचे संभाषण यांच्या टेपमध्ये असल्याचे दिसते. अस्थाना व रॉचे क्रमांक दोनचे अधिकारी सुमित कुमार गोयल यांच्यातील संभाषणही सादर करण्यात
आले.

हे फोनवरील संभाषण उघड (लीक) व्हावे आणि त्यातून अस्थाना व साना यांच्यातील लाचेचे प्रकरण समारे यावे, याची कारणे अर्थातच स्पष्ट आहेत. आपल्याकडे अस्थाना यांनी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती, असे निवेदन साना यांनी न्यायालयासमोर केले आहे. येत्या काही दिवसांत सीबीआयमधील वादाची आणखी लक्तरे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी लक्तरे बाहेर येण्याची शक्यता
हे फोनवरील संभाषण उघड (लीक) व्हावे आणि त्यातून अस्थाना व साना यांच्यातील लाचेचे प्रकरण समारे यावे, याची कारणे अर्थातच स्पष्ट आहेत. आपल्याकडे अस्थाना यांनी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती, असे निवेदन साना यांनी न्यायालयासमोर केले आहे. येत्या काही दिवसांत सीबीआयमधील वादाची आणखी लक्तरे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Web Title: CBIvsCBI: 'Asthana is your man, do not take vengeance!' Details of the bill exposed from the phone conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.