प्रफुल्ल पटेल यांना 'सीबीआय'ने दिली क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:33 AM2024-03-29T05:33:46+5:302024-03-29T06:52:55+5:30

एअर इंडियाला विमान भाडेतत्त्वावर देताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केल्याप्रकरणी गैरव्यहार २०१७ मध्ये सीबीआयने गुन्हा नोंदविला होता.

CBI gave clean chit to Praful Patel | प्रफुल्ल पटेल यांना 'सीबीआय'ने दिली क्लीन चिट

प्रफुल्ल पटेल यांना 'सीबीआय'ने दिली क्लीन चिट

नवी दिल्ली: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने बंद करत त्यांना क्लीन चिट दिली. एअर इंडियाला विमान भाडेतत्त्वावर देताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केल्याप्रकरणी गैरव्यहार २०१७ मध्ये सीबीआयने गुन्हा नोंदविला होता.

प्रफुल्ल पटेल यांनी हवाई वाहतूक मंत्री असताना, त्यांच्या विभागासह एअर इंडिया व अन्य लोकांच्या संगनमताने त्यांच्या मंत्रिपदाचा वापर एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी केल्याचा आरोप ठेवला होता. विमाने घेताना, हा भाडेकरार करण्यात आल्याचा आरोपही केला होता. 

तपासादरम्यान, भाडेकरारात करार लवकर संपविण्याबाबतच्या कलमाचा उल्लेख आढळला नाही. त्यामुळे सीबीआयने पटेल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली.

Web Title: CBI gave clean chit to Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.