ओवैसी गुजरातेत प्रभाव टाकू शकतील का? किती उमेदवार उभे केले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:22 PM2022-12-03T13:22:42+5:302022-12-03T13:23:24+5:30

‘व्होट कटवा’चा शिक्का पुसण्याचे प्रयत्न

Can Owaisi AIMIM make an impact in Gujarat Election? | ओवैसी गुजरातेत प्रभाव टाकू शकतील का? किती उमेदवार उभे केले

ओवैसी गुजरातेत प्रभाव टाकू शकतील का? किती उमेदवार उभे केले

Next

शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २० वर्षांपूर्वीच्या गुजरात दंगलीसाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्याचा उल्लेख करून राज्य विधानसभा निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या एआयएमआयएमला प्रासंगिक बनवले आहे. लोकसभा सदस्य असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मागील वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २३ जागा जिंकून उपस्थितीची नोंद केली. यावेळी पक्ष १८२ पैकी केवळ १३ जागांवर लढत आहे; काँग्रेसचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थिती मजबूत आहे, तेथेच या पक्षाने उमेदवार उतरवले आहेत. 

यावर ओवैसी म्हणतात की, गुजरातेत मागील २७ वर्षांपासून काँग्रेस एकदाही भाजपला पराभूत करू शकलेली नाही. तेव्हा तर माझा पक्ष येथे लढत नव्हता. अमित शहांच्या धडा शिकवण्याच्या विधानावर ते विचारतात की, ते कोणत्या धड्याबाबत बोलत आहेत? नरोदा पाटिया, गुलबर्ग सोसायटी, बेस्ट बेकरी की बिल्कीस बानोचा धडा ? या सर्व ठिकाणी मुस्लिम मोठ्या संख्येने मारले गेले, असे ओवैसी म्हणाले.

आतून विरोध
पक्षाचे लोक आपल्याच नेत्याला हिरवा कमळ किंवा छुपा कमळ म्हणतात. भाजपच्या बालेकिल्ल्यात मुकाबला करायला पाहिजे होता; परंतु पक्ष भाजपच्या गडात जाऊन तेथे मतांची विभागणी करीत आहे, असे एआयएमआयएमचे काही लाेक म्हणत आहेत.

येथे लढताहेत उमेदवार
मुस्लिमांची मोठी लोकसंख्या असलेल्या कच्छच्या मांडवी, मुंद्रा व भुज या तीन जागांबरोबरच सौराष्ट्रचे मंगरोल, लिंबायत व सुरत पूर्व, अहमदाबाद जिल्ह्यातील दानिलमडा, जमखंभालिया, मध्य गुजरातचे गोधरा, दरियापूर, बापूनगर, जमालपूर खादिया व उत्तर गुजरातेतील सिद्धपूर जागांवर एआयएमआयएमने उमेदवार आहेत. 

Web Title: Can Owaisi AIMIM make an impact in Gujarat Election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.