चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:40 AM2017-11-24T11:40:20+5:302017-11-24T13:04:28+5:30

एका चार वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्याच मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे.

Can a 4 year old son be raped? The school rejected the charge | चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले 

चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो का? शाळेने आरोप नाकारले 

Next

नवी दिल्ली : एका चार वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्याच मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे. ईशान्य दिल्लीतील ज्या प्रतिष्ठित खासगी शाळेत ही घटना घडली आहे ते शाळा प्रशासन या घटनेनं हादरलं आहे. पण एखादा चार वर्षाचा मुलगा बलात्कार करू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं असून पोलीस अधिकारी देखील या घटनेमुळे संभ्रमात आहेत. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. अशी घटना घडली आहे की नाही याबाबत संभ्रम अशल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे. जर अशी घटना खरंच घडली असेल तर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, कारण अशा प्रकरणात इतक्या छोट्या मुलावर लावण्यासाठी आयपीसीमध्ये कोणतंही कलम नाही. 
अशाप्रकारची घटना घडणं अशक्य असल्याचं शाळेचे वकील एनबी जोशी म्हणाले. मुलांचं वॉशरूम मुलींच्या वॉशरूमपासून बरंच दूर आहे. मुलगा मुलींच्या वॉशरूममध्या जाण्याचा फ्रश्नच येत नाही. सीसीटीव्ही फूटेजमध्येही मुलगा वॉशरूममध्ये जाताना दिसत नाही असं जोशी म्हणाले.  
पोलिसपण हैराण -  
आरोपी मुलगा केवळ चार वर्षांचा आहे. आयपीसीच्या सेक्शन 82 नुसार, 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाद्वारे केलेलं कोणतंही कृत्य गुन्हा मानला जात नाही. यानुसार, मुलाला बाल सुधारगृहात देखील पाठवला येऊ शकत नाही. लैंगिंक शोषण सिद्ध झाल्यावरच शाळेवर कारवाई करता येईल. 
तज्ञ देखील हैराण- 
एखादा 4- 5 वर्षाचा मुलगा असं काही करू शकतो हे वैद्यकीय दृष्ट्या शक्य नाही,  शारिरिक किंवा मानसिक दृष्ट्या इतक्या कमी वयात मुलं प्रगल्भ नसतात, असं दिल्लीतील AIIMS चे  मनोचिकित्सक डॉक्टर नंद कुमार म्हणाले.   
मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला खरा, पण आरोपीचे एवढे लहान वय बघता या प्रकरणाची कायदेशीर हाताळणी नेमकी कशी करायची, याविषयी ते संभ्रमात पडले आहेत. आम्ही हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असून कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
पोलिसांनी या विद्यार्थ्याला खरंच अटक केली तर केवळ ‘पॉक्सो’ कायद्याखालचाच नव्हे तर बलात्काराच्या गुन्ह्यातील देशातील तो सर्वात लहान वयाचा आरोपी ठरेल. दंड प्रक्रिया संहितेत सात वर्षांपर्यंतच्या मुलांना गुन्ह्यांच्या बाबतीत विशेष संरक्षण आहे. या प्रकरणात ते कसे व कितपत लागू होते याची पोलीस तपासणी करीत आहेत.
मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार गेल्या शुक्रवारी शाळेत घडला. आरोपी विद्यार्थ्याने आधी वर्गात आणि नंतर वॉशरूममध्ये त्याच्यासोबत शिकणाºया या मुलीची पॅन्ट काढून तिच्या गुप्तांगात टोक केलेली शिसपेन्सिल व बोट घुसविले, असा आरोप आहे.
तरतूद भेदभावाची-
या प्रकरणाचा विचार करता फौजदारी कायद्यांमधील तरतुदी पुरुष आणि स्त्री यांना भेदभावाची वागणूक देणारी आहे, असे जाणवते. लज्जा हे स्त्रीचे जन्मजात व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे मुलगी वयाने कितीही लहान असली तरी तिचा विनयभंग होतो, असे कायदा मानतो. मुलाच्या बाबतीत मात्र हे लागू नाही. एवढ्या लहान मुलाने ही कृती केली खरी पण ती करताना त्याच्या मनात लैंगिक भावना नव्हती, असा बचाव कायद्यापुढे टिकू शकत नाही.

Web Title: Can a 4 year old son be raped? The school rejected the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.