रेल्वेच्या भटारखान्यांवर कॅमेऱ्यांची नजर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:52 AM2018-05-09T01:52:51+5:302018-05-09T01:52:51+5:30

रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.

Cameras look at railway kitchen | रेल्वेच्या भटारखान्यांवर कॅमेऱ्यांची नजर  

रेल्वेच्या भटारखान्यांवर कॅमेऱ्यांची नजर  

Next

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.
रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा अत्यंत वाईट असतो, असे ताशेरे कॅगने अहवालात ओढले होते. त्यानंतर रेल्वे खात्याने भटारखान्यांमध्ये प्रत्येकी आठ सीसीटीव्ही बसविले आहेत. अस्वच्छता असेल तर तसा संदेश नियंत्रण कक्षाला दिला जाईल़
कक्षातील स्क्रीनवर कोणत्या भटारखान्यांमध्ये काय काम चालू आहे, हे दिसते. उंदीर, घूस किंवा झुरळ फिरताना सीसीटीव्हीने टिपले तर नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर धोक्याची निशाणी दाखविली जाते.
गणवेश नसल्यास दखल
शेफने खाद्यपदार्थ बनविताना डोक्यावर टोपी व गणवेश घातला नसेल तर ही बाब कंत्राटदाराला कळविली जाते. सध्या १६ मुख्य भटारखान्यांत हा प्रकल्प राबविण्यात येत असला तरी नजीकच्या काळात त्याचा विस्तार करण्यात येईल.

Web Title: Cameras look at railway kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.