विदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात मुंबई जगात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 08:33 PM2018-02-27T20:33:00+5:302018-02-27T20:33:00+5:30

विदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आपली मुंबई एक नंबरी

business-news/worlds-highest-paid-expats-are-booking-a-passage-to-mumbai | विदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात मुंबई जगात पहिली

विदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात मुंबई जगात पहिली

Next

मुंबई -  भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई विदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात जगात प्रथम स्थानावर असल्याचे एका सर्वेमध्ये समोर आले आहे.  एकवेळ कोट्यावधींचा पगार देण्यात अमेरिका किंवा युरोपमधील देश अव्वल होते. पण 21 व्या शतकामध्ये मुंबईंने सर्वच देशांना मागे टाकत प्रथम स्थान काबिज केलं आहे. 

परदेशांतील नागरिकांना मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्याचे वास्तव HSBC बँक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सर्वेनुसार समोर आले आहे. इतर देशांच्या तुलनेत मुंबईत विदेशी कर्मचाऱ्यांना अधिक मानधन दिले जाते. HSBCच्या रिपोर्ट नुसार मुंबईत काम करणाऱ्या विदेशी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 2.17 लाख डॉलर म्हणजेच 1.40 कोटी आहे. हा आकडा ग्लोबल एक्सपर्ट ॲव्हरेजपेक्षा दुप्पट आहे. या स्वर्हेमध्ये आघाडीच्या दहा देशांची नावे जाहीर करण्यात आली आहे.  यामध्ये शांघाय, जकार्ता आणि हाँग काँग यांसारख्या अन्य आशियाई देशांचा समावेश आहे. युरोपमधील टेक सेंटर डबलिन एक्सपॅटमध्ये काम करणाऱ्यांना संधी देण्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. पण वार्षिक पगार देण्यामध्ये पिछाडीवर आहे.

HSBCच्या सर्वेनुसार, एक कोटी 80 लाख कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबईत रोजगार संधी अमेरिका आणि ब्रिटनपेक्षा कमी आहेत. अमेरिका आणि युरोपमधील नोकऱ्या आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या आकर्षक असतात. तसेच आपल्या कौशल्याला पुढील पातळीवर पोहोचवण्यास मदत व्हावी म्हणून या देशांत नोकरी मिळवण्यासाठी नोकरवर्गाची नेहमीच धडपड सुरू असते. 

Web Title: business-news/worlds-highest-paid-expats-are-booking-a-passage-to-mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.