मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:22 PM2019-01-09T15:22:18+5:302019-01-09T15:22:39+5:30

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते.

Budget session likely from January 31 to February 13, interim budget on February 1 | मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

googlenewsNext

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते.

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीच्या बैठकीत (CCPA) अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरविण्यात आली आहे. लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे, कारण एप्रिल किंवा मे महिन्यात आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. 


मोदी सरकारसाठी हा अंतरिम अर्थसंकल्प महत्वाचा आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. तसेच, नोकरदारांच्या कर बचत मर्यादेत वाढ आणि आयकराची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, गृहकर्जावरही सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Budget session likely from January 31 to February 13, interim budget on February 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.