Budget 2019: Will Modi Government launch a minimum income guarantee scheme for the poor? | Budget 2019 : मोदी सरकार गरिबांसाठी किमान उत्पन्न हमी योजना आणणार का?
Budget 2019 : मोदी सरकार गरिबांसाठी किमान उत्पन्न हमी योजना आणणार का?

ठळक मुद्देअर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून 'या' योजनेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.मोदी सरकार गरिबांसाठी किमान उत्पन्न हमी योजना आणणार का?

नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या किमान उप्तन्न हमी योजनेची या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या सोमवारी एका सभेत बोलताना जर 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न देणारी योजना आणली जाईल, असे जाहीर केले. तसेच,  किमान उत्पन्न हमी योजनेविषयी बोलताना एका मुलाखतीदरम्यान माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दिवसाला 321 रुपये याप्रमाणे महिन्याला 9 हजार 630 रुपये इतके केंद्राकडून द्यावे लागतील. यामध्ये 18 ते 20 टक्के कुटुंबांचा विचार केला असता जवळपास पाच लाख कोटीं इतका खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात गरिबांसाठी किमान उत्पन्न देणारी योजना जाहीर करण्याची शक्‍यता आहे. कर्ज माफ करण्यापेक्षा उत्पन्नाच्या माध्यमातून आधार देणारी योजना केव्हाही चांगली असेल असे इंडिया रेटिंग्ज या संस्थेने म्हटले आहे. तेलंगणामध्ये रायथू बंधू योजना आहे, या धर्तीवर केंद्र सरकार हंगामी बजेट सादर करताना योजना आणेल असा अंदाज आहे.

Budget 2019 Latest News & Live Updates
 

English summary :
Budget 2019 Latest News: Finance Minister Piyush Goyal will present the interim budget in the Lok Sabha at 11 AM. This is the last budget of Prime Minister Narendra Modi's tenure on the backdrop of upcoming Lok Sabha elections. The minimum endowment guarantee scheme is likely to be announced in this interim budget.


Web Title: Budget 2019: Will Modi Government launch a minimum income guarantee scheme for the poor?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.