थोडक्यात /सारांश

By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:07+5:302015-08-02T22:55:07+5:30

भटक्या कुत्र्यांचा त्रास

Brief / summary | थोडक्यात /सारांश

थोडक्यात /सारांश

Next
क्या कुत्र्यांचा त्रास
मुंबई : भांडूप पश्चिमेकडील सरदार प्रतापसिंह संकुलात कुत्र्यांची वाढती संख्या रहिवाशांना त्रासदायक ठरत आहेत. परिसरात रात्रपाळीवरून येणार्‍या चाकरमान्यांच्या पाठी कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी लागतात. त्यांच्या हातात असणार्‍या पिशव्या हिसकावतात. पायी चालणार्‍या चाकरमान्यांबरोबर दुचाकी चालकांनाही याचा त्रास होतो.

उंदरांचा उपद्रव
मुंबई : शहर-उपनगरात लेप्टोपायरसिसचा प्रादुर्भाव होत असताना ठिक-ठिकाणी उंदरांचाही उपद्रवही वाढत असल्याचे दिसून येते आहे. बोरीवली स्थानक आणि रुळांवर उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे, त्यामुळे तेथील सफाई कर्मचारी तसेच प्रवाशांना आरोग्याला धोका संभवू शकतो.

परंपरेचे जतन व्हावे
मुंबई : कृषी व्यवस्था आपल्या परंपरेप्रमाणे व भिन्न पद्धतीने समृद्ध झाली आहे. त्याचे जतन आधुनिक तंत्र अवलंबिताना झाले पाहिजे. याबाबत कृषी ज्ञान कोषाचे खंड हे महत्त्वाचे काम करत असल्याने याचा अधिक प्रसार झाला पाहिजे, असे मत राज्यपाल सी.विद्यासागर यांनी व्यक्त केले.अवे मारिया पब्लिकेशन्स याच्या तर्फे कृषी ज्ञान कोषाचे सात खंड राज्यपाल के. विद्यासागर राव यांना सादर केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अण्णाभाऊ साठे जयंती
मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णाभाउ साठे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.

फेर्‍या वाढवा
मुंबई : बेस्ट क्रमांक ५० च्या फेर्‍या वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. भाऊचा धक्का ते वरळी मार्गावरील बसच्या फेर्‍या अत्यल्प असल्याने प्रवाशांना बसस्टॉपवर ताटकळत थांबावे लागते. शिवाय, यामुळे येणार्‍या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने गैरसोयही वाढते. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने या मागणीचा विचार करावा.

तारगल्लीची वाहतूक कोंडी कायम
मुंबई : कुर्ला आणि अंधेरीला जोडणार्‍या काळे मार्गावरील तारगल्लीतील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. तारगल्लीमधील भंगारचे व्यापारी आपल्या गाळ्यांतील अर्धाधिक साहित्य रस्त्याच्या कडेला मांडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांसह पादचारी वर्गाला त्रास होतो आहे. विशेषत: अवजड वाहनांना वाहतूकीस अडचण होत असून, यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वाहतूक पोलीसांसह महापालिकेला विनंती करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेने कारवाई करूनही समस्या जैसे थे राहिल्याने येथील वाहतूकीची कोंडी कायम आहे.

शीतल तलावालगत जीवरक्षक नेमा
मुंबई : कुर्ला पश्चिमकेडील शीतल तलाव येथे जीवरक्षक नेमण्यात यावे, यासाठीची मागणी आता जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात हा तलाव भरून वाहू लागला असून, येथे स्थानिक परिसरातील मुले पोहण्यासाठी गर्दी करतात. स्थानिकांकडून हटकूनही पोहण्यासाठी आलेली मुले त्यांना जुमानत नाहीत. अशावेळी एखादी दुर्घटना घडू शकते. परिणामी दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून किमान एक तरी जीवरक्षक येथे नेमण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडूनच जोर धरू लागली आहे.

एलबीएसवरवरील मोठी गटारे उघडी
मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणार्‍या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कमानीपासून शीतलपर्यंतच्या मोठया गटारांवरील झाकणे नादुरुस्त झाली आहेत. मे महिन्यांपासून गटारावरील काही झाकणे तुटली असून, तुटलेल्या काही भागावर लाकडी फळ्या टाकण्यात आल्या आहेत. दिवसा हे भाग दिसत असले तरी रात्री पादचार्‍यांचा त्यामुळे अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे गटारांवरील ज्या ठिकाणाची झाकणे तुटली आहेत; तेथे नवी झाकणे बसविण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Brief / summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.