बॉम्ब, अपहरणाची धमकी; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, १२२ जण सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:16 AM2017-10-31T00:16:53+5:302017-10-31T00:17:22+5:30

मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान अपहरण आणि बॉम्बच्या धमकीनंतर तातडीने अहमदाबाद येथे उतरविण्यात आले. या विमानात ११५ प्रवासी व चालक दलाचे ७ कर्मचारी होते.

Bomb, threat of abduction; Emergency landing of the plane, 122 people suicidal | बॉम्ब, अपहरणाची धमकी; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, १२२ जण सुखरूप

बॉम्ब, अपहरणाची धमकी; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, १२२ जण सुखरूप

Next

अहमदाबाद/नवी दिल्ली : मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान अपहरण आणि बॉम्बच्या धमकीनंतर तातडीने अहमदाबाद येथे उतरविण्यात आले. या विमानात ११५ प्रवासी व चालक दलाचे ७ कर्मचारी होते. विमानाच्या स्वच्छतागृहात उर्दू व इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. ‘विमानात १२ अपहरणकर्ते आहेत व विमानाच्या सामान ठेवण्याच्या जागेत बॉम्ब ठेवले आहेत. विमान कुठेही न थांबविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे, अन्यथा बॉम्बचो स्फोट केले जातील,’ अशी धमकी त्या चिठ्ठीत
होती.
या विमानाने मुंबईहून रात्री उशिरा २.५५ वाजता उड्डाण केले होते. विमानात चिठ्ठी सापडताच वैमानिकाने ताबडतोब जवळच असलेल्या अहमदाबाद विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकांशी संकर्प साधला. हे विमान (९ डब्ल्यू ३३९) सोमवारी पहाटे ३.४५ वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरविण्यात आले.
तेथे सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. याबाबत माहिती देताना सुरक्षा ब्यूरोच्या एका अधिकाºयाने सांगितले की, सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतर काहीही सापडले नाही. या विमानतळावर ६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी आणि अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजता हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले.
उर्दू आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत ‘अल्लाह इज ग्रेट’ असे लिहिले आहे. यात असा इशाराही दिला होता की, जर आपण विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला विमानात लोकांच्या मृत्यूचे चित्र दिसेल. याला थट्टा समजू नका. सामान ठेवण्याच्या जागी बॉम्ब
आहेत.
विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न केला, तर स्फोट होईल.

धमकी देणा-यास पकडले, यापूर्वीही दिला होता त्रास...
धमकी देणा-या व्यक्तीला पकडण्यात आले असून, बिरजू सल्ला असे त्याचे नाव आहे. तो गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला येथील रहिवासी आहे.
विशेष म्हणजे त्याला पकडण्यापूर्वी नागरी विमान उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले होते की, या व्यक्तीला ‘नो फ्लाय’ श्रेणीत टाकण्यात यावे. याच व्यक्तीने बाथरूममध्ये पत्र ठेवले होते. यापूर्वीही त्याने एअरलाइन्सला त्रस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

लँड होताना मोर धडकला
कोइम्बतूर : शारजाहून आलेले ‘एअर अरेबिया’चे एक विमान कोइम्बतूर येथे विमानतळावर उतरत असताना हवेत उडणाºया मोराची या विमानाला धडक बसली; पण सुदैवाने पायलटने हे विमान सुरक्षितरीत्या उतरविले. या विमानात १०७ प्रवासी होते.

Web Title: Bomb, threat of abduction; Emergency landing of the plane, 122 people suicidal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.