Body of a 9-year-old girl found inside a bag in a drain in Rohtak's Titauli village | नाल्यातील बॅगेत सापडला चिमुरडीचा मृतदेह, हाताचा एक पंजा गायब
नाल्यातील बॅगेत सापडला चिमुरडीचा मृतदेह, हाताचा एक पंजा गायब

नवी दिल्ली- उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतकमध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह बॅगेत सापडला असून मृतदेह असलेली बॅग एका नाल्यात सापडली. 

रोहतकमधील टिटोली गावात शेतातील नाल्यात 8 ते 10 दरम्यान वय असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला. नाल्यात पाणी कमी असल्याने तो मृतदेह असलेली बॅग वाहून न जाता तिथेच अडकून पडली.  या प्रकरणात मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचे खासगी भाग बाहेर निघाले आहेत तसंच तिच्या हाताचा पंजाही गायब आहे. 4-5 दिवस आधी ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

टिटोली गावात शेतात काम करणाऱ्या लोकांना तेथे एक बॅग सापडली. त्या बॅगेच्या बाहेर हात लोकांना दिसले. त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी बॅग बाहेर काढून उघडल्यावर त्यामध्ये मुलीचा मृतदेह दिसला. मुलीचा मृतदेह अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असून चार ते पाच आठवड्यांपासून हा मृतदेह असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 

'घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. तपास सुरू केला असून हत्येचं कारण अजूनही समजलं नाही. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. पोस्टमार्टेमनंतर घटनेता खुलासा होईल, अशी माहिती पोलीस तपास अधिकारी देवी सिंह यांनी दिली आहे. 
 

English summary :
Body of a 9-year-old girl found inside a bag in a drain in Rohtak's Titauli village


Web Title: Body of a 9-year-old girl found inside a bag in a drain in Rohtak's Titauli village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.