भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली, टीका करताना यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 02:02 PM2017-10-12T14:02:37+5:302017-10-12T14:05:16+5:30

देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

BJP's Union minister's tongue collapsed, criticizing Yashwant Sinha, said Gadadi |  भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली, टीका करताना यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार 

 भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली, टीका करताना यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार 

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिन्हांवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये आता केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हेही सामील झाले आहेत. यशवंत सिन्हा यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतल्यानंतर सुप्रियो यांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले असून, देशद्रोही, गद्दार असा त्यांचा उल्लेख केला आहे.
 मोदी सरकारला देशाच्या आर्थित स्थितीवरून धारेवर धरणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी जय शाह यांच्या संपत्तीच्या मुद्यावरूनही भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. "जय शाह प्रकरणात भाजपाने आपली नैतिकता गमावली आहे. ज्यापद्धतीने केंद्रीय मंत्री त्यांच्या बचावासाठी उभे राहत आहेत, त्यावरून डाळीत काहीतरी काळे असल्याचे सिद्ध होत आहे." अशी शंका यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केली होती. 
दरम्यान या टीकेला बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे."यशवंत सिन्हा हे काय करत आहेत. त्यांच्याकडे भाजपाला देण्यासारखे आता काही नाही. मात्र आमच्यासारख्या नव्या पिढीला त्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण हक्क आहे. ते आमचेच नुकसान का करत आहेत? असा सवाल त्यांवी उपस्थित केला.  
पियूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शाह यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करताहेत. जय शाह यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पियूष गोयल यांच्यासह उत्तर प्रदेशचे एक मंत्री व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ज्या पद्धतीनं कंपनीच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे मला धक्काच बसला आहे, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. 
केंद्रीय मंत्र्यांच्या अशा वागणुकीमुळे जनतेमध्ये भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. यशवंत सिन्हा म्हणाले, जय शाह यांच्या कंपनीची ज्यांच्याशी देवाण-घेवाण झाली, ते मला मीडियामधूनच समजलं. परंतु एका नागरिकाच्या बचावासाठी केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीनं समोर येतात ते चिंताजनक आहे. या उलाढालीत कदाचित कोणताही गैरव्यवहार नसेलही, जय शाह हे स्वतः व्यापारी आहेत. ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतात. जय शाह यांनी बदनामीचा फौजदारी खटला भरला आहे. त्यांचा बचाव अतिरिक्त सॉलिसिटर जनरल करणार आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शाह यांचा खटला लढतायत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग करूनही त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असंही सिन्हा म्हणाले आहेत. 
गेल्या काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही असं सांगत यशवंत सिन्हा यांनी आपले बंड अद्याप कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.  

Web Title: BJP's Union minister's tongue collapsed, criticizing Yashwant Sinha, said Gadadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.