भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:54 AM2019-01-02T05:54:07+5:302019-01-02T05:55:49+5:30

यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल.

 BJP will not go on 160: Digvijay Singh | भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

Next

- सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : देशाच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती हे उत्तर प्रदेश व बिहारमधल्या १२० जागा ठरवतात. भाजपा व अपना दलाला २०१४ साली उत्तर प्रदेशात ७३, तर बिहारमध्ये एनडीएला ३१ जागा म्हणजे एकूण १२० पैकी १०४ जागा मिळाल्या. आता ही स्थिती कायम राहणार नाही हे भाजपाही मान्य करते. यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. काश्मीर, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतही भाजपाच्या जागा घटणारच आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष केंद्रीय सत्तेबरोबर राहतात. प.बंगाल, ओडिशा व दक्षिण भारतातल्या ४ राज्यांत भाजपाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० ते १७० च्या आसपास व काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळतील, असा सर्वांचाच अंदाज आहे. काँग्रेसच्या जागा १०० पेक्षा किती वाढतील याचे आज भाकीत करणे कठीण आहे. मोदी व शहांना सर्वाधिक भीती काँग्रेस व राहुल गांधींची वाटते हे मात्र स्पष्ट आहे.
देशाला अन् भाजपमध्येही अनेकांना मोदी नको आहेत. पद अन् सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. देशात धार्मिक व जातीय विद्वेषाची बीजे तर पेरलीच आहेत. त्याचा भडका उडवण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी होईल.
पाकिस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; पण रिझर्व बँक, नीती आयोग या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा मोदींनी धुळीला मिळवली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लघु उद्योग, लहान व्यापारी व शेतकऱ्यांची सरकारने पिळवणूक केली. देशात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची कारणे अनेक आहेत.

स्वस्थ बसून चालणार नाही
डिजिटल इंडियाचा जगभर गाजावाजा सुरू असताना, इतकी साधी मागणी निवडणूक आयोग पूर्ण करू शकत नसेल, तर स्वाभाविकपणे आगामी निवडणुकीबाबतच अनेक शंका उत्पन्न होतात. आयोगाच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही. मात्र, रास्त शंकांचे योग्यप्रकारे निरसन होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनीही स्वस्थ बसून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title:  BJP will not go on 160: Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.