भाजपमध्ये लोकशाही नव्हे, हुकूमशाहीच : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:55 AM2019-04-06T05:55:07+5:302019-04-06T08:23:45+5:30

लोकमत विशेष मुलाखत : ...तर मांजर पंजा मारेलच ना!

BJP is not democracy but dictatorial: Shatrughan Sinha | भाजपमध्ये लोकशाही नव्हे, हुकूमशाहीच : शत्रुघ्न सिन्हा

भाजपमध्ये लोकशाही नव्हे, हुकूमशाहीच : शत्रुघ्न सिन्हा

Next

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : भाजप हुकुमशाही पध्दतीने काम करु लागला आहे, वन मॅन शो झालाय. वन मॅन शो अ‍ॅन्ड इन टू मॅन आर्मी. हे दोघेजण मिळून पक्ष आणि सरकार चालवताहेत, अशी टीका खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली. त्यांना सर्व विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. सिन्हा यांची खास मुलाखत...



मग असे काय घडले ?
नानाजी देशमुख यांनी मला घडवलं. त्यांनी मला अटलजी, अडवाणीजींच्या ताब्यात दिले. मला इतके प्रेम मिळाले, की मी त्यांच्यासोबत राहू लागलो. परंतु आमचा पक्ष अटलजी, आडवाणीजी यांच्यावेळच्या लोकशाहीतून हुकूमशाहीत बदलत गेला. सुरुवातीच्या काळात जसे सामूहिक निर्णय घेतले जात होते, ते आता संपुष्टात आले. अधिकारशाही (आॅथेरेटियन रुल) सुरु झाली. संवाद बिलकुल संपला. आपण आडवाणीजी, डॉ. मुरली मनोहर जोशीजी, विद्वान यशवंत सिन्हाजी व अरुण शौरींबाबत काय झाले, ते आपण पाहताच आहात. हे लोक आडवाणीजींचे समर्थक आहेत, असे त्यांना वाटले असावे. किंवा मी सत्य आणि सिध्दांतांंवर अधिक जोर देतो आहे, असेही त्यांना वाटले असेल. परंतु मांजरीला खोलीत बंदिस्त केलं आणि तिला रस्ता मिळाला नाही तर ती पंजा तर मारेलच ना. इतके होऊनही मी म्हणालो होतो, की मी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला काढून टाकावे. परंतु ते मला काढूच शकले नाहीत.

त्यांची काय अडचण होती?
देशात मी सर्वाधिक मताधिक्यांनी जिंकलो होतो. तथाकथित मोदी लाटेत एकाही स्टार प्रचारकाला बोलाविले नव्हते. अगदी आडवाणीजी, यशवंत सिन्हाजी, राजनाथसिंहजी, सुषमा स्वराजजी यांच्यापैकी कोणालाही बोलाविले नव्हते.
मोदीजींनाही बोलाविले नव्हते?
मोदीजींनी येऊ (पान ११ वर)


इच्छित होते. त्यांनी मला फोनही केला होता. मी त्यांची प्रशंसा केली, कौतुक केले आणि म्हटले, की आम्हाला गरज वाटली तर तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार. परंतु मी बोलाविले नाही. पण ही कसली मोदी लहर, जो इतर अनेकांसाठी मोदी कहर बनला. कहर इतका झाला, की अरुण जेटलींसारखे नेते वाईट पध्दतीने पराभूत झाले. शाहनवाज हुसेन पराभूत झाले. जेव्हा त्यांनी पाटण्यातून दुसऱ्या नावाची घोषणा केली, तेव्हा या शहाण्याला केवळ इशारेच पुरेसे होते.

आपण व मोदींचे खूप चांगले संबंध होते ते आपल्याकडे आलेही होते ?
माझा मुलगा कुशच्या विवाह समारंभासाठी ते मुंबईत आले आणि लगेच परत दिल्लीला गेले होते. मात्र, मला मंत्री न बनविण्याची समजूत घालण्यासाठी ते आले होते, असे काही लोक म्हणतात. हा दुष्प्रचार अरुण जेटली यांनीच केला. परंतु, खरे तर त्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी ते आले होते.

या संघर्षातील टर्निंग पॉईट काय होता?
त्यांचा अहंकार, दंभ. त्यांनी मला मंत्री केले नाही, काही बिघडले नाही. आम्ही स्वत:साठी पक्षाकडे काहीही मागितले नाही. मोदींजींंच्या मंत्रिमंडळात मंत्री बनलो असतो, तरी काय झाले असते? आज किती मंत्र्यांना लोक ओळखतात?, आज चलती कोणाची आहे? संवादच संपलेला आहे. ना पक्षात, ना घरात, ना कार्यालयात, ना कॅबिनेटमध्ये. सर्वजण स्तुती करण्यात मग्न आहेत. मी भाजपमध्ये वाढलो, मोठा झालो. राजकारणही येथूनच शिकलोय. मी पाहतोय, की काही लोक दंभ आणि अहंकारात जगताहेत आणि इतर मौनी आहेत.
आपला तर संघाशीही चांगला संबंध आहे.
संघाशी माझे चांगले संबंध आहेत. मला वाटते की, संघ गुपचूप पाहत आहे. मी नागपूरचा, नागपूरच्या लोकांचा, संघातील लोकांचा मोठा सन्मान करतो. परंतु काय करणार ?
तर मग आता महाभारत होणार?
बिलकुल होणार.
या महाभारताचा धृतराष्ट्र कोण ?
मी हेच सांगेन, जेव्हा नष्टचक्राची छाया मनुष्यावर पसरते, तेव्हा विवेकाचा मृत्यू होतो. ही न्याय व अन्यायाची लढाई आहे. ‘न्याय’ची गोष्ट माझे मित्र काँँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितली आहे. आमचे पंतप्रधान याला दांभिक म्हणतात. काय, काय आश्वासने दिलीत? ज्याने साडेसहा लाख गांवामध्ये वीज आणली, त्याची आपण चर्चा करत नाही. आपण १८,000 गावांमध्ये तरी वीज पोहोचवली की नाही, माहीत नाही, परंतु त्याचा आपण प्रचार करता. आपण आश्वासने देता, ती रासलीला आणि राहुल गांधींनी केली की मात्र, त्यांचे कॅरेक्टर ढिला? असे कसे चालेल.

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही आपल्याला आमंत्रण होते. आपण काँग्रेसचीच का निवड केलीत ?
बऱ्याच पक्षांनी मला आमंत्रणे दिली होती. केजरीवालना मी माझा छोटा भाऊच मानतो. ममता बॅनर्जी यांनी मला मोठा आदर, प्रेम आणि आत्मसन्मान दिला. अखिलेश आणि मायावतीजीही खूप चांगली लोकं आहेत. मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. परंतु खºया अर्थाने हुकूमशाही नष्ट करायची असेल, तर राष्ट्रीय पक्षाची निवड करायला हवी. मी नेहरु-राहुल गांधी परिवाराचा समर्थक आहे. जर आपण माझे एनीथिंग बट खामोश, हे पुस्तक वाचाल तर त्यात लिहिले आहे, जर मॅडम गांधी असत्या तर मी आज काँग्रेस पक्षात असतो. त्यावेळी मी हे लिहिले होते, परंतु आज त्या नाहीत.
आपणाला वाराणसीहून निवडणूक लढवायला सांगितल्याचे समजते
बºयाच लोकांनी याबाबत सांगितले, इच्छा व्यक्त केली आणि प्रेम आणि सन्मानपूर्वक आग्रहही केला आहे. परंतु इतक्यात त्यावर मी काही बोलू शकत नाही, कारण सध्यातरी माझे सारे लक्ष्य पाटण्यावरच आहे.
पाटण्यातून का ?
पाटण्यातील जनतेने मला भरपूर सहकार्य केले आणि पाठिंबाही दिला आहे. साºया बिहारचे प्रेम मला मिळालेले आहे. वाराणसीबाबत काही बोलणे घाईचे होईल.
दिल्लीतून केजरीवाल यांनीही निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसनेही मान्य केले होते?
होय, विचारले होते. परंतु सध्या तरी मी तेल आणि तेलाची धार पाहतो आहे. आगे-आगे देखिए, होता है क्या?
भाजपने ७५ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे तिकिट कापण्याचे धोरण ठरविले आहे..?

हा फॉर्म्युला मला लागू होत नाही. त्यासाठी बराच वेळ आहे. वयाचाच मुद्दा असेल तर खुद्द पंतप्रधानसुध्दा याच धोरणांतर्गत येतात. त्यांनी तर संन्यास आणि डोंगरदºयात प्रवासाची गोष्ट सांगितली आहे. लोक तर त्यांची पदवीही खरी मानत नाहीत, तर मग वयाची गोष्ट कशी खरी मानतील? त्यांच्याजवळ सर्टिफिकेटही नाही, त्यांना डिग्रीही मिळालेली नाही अजून. तर मग जे वय त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे, ते तरी कसे खरे मानावे? त्यांनी निवडणूक आयोगाला बरेच काही सांगितलेले नाही. आपल्या वैवाहिक जीवनाबाबतही सांगितले नाही. म्हणूनच पंतप्रधानांची वयोमर्यादा आणि ७५ वर्षाचे धोरण यामध्ये फार अंतर नसेल. परंतु वयामुळे व्यक्तीच्या सक्रियतेमध्ये काही फरक पडू शकतो, असे मी मानत नाही.

आपण आयुष्यातील  इतका मोठा निर्णय घेण्याचे कारण काय? आपण भाजपाचे सुरुवातीपासूनचे साथीदार होतात ?

कारण जगजाहीर आहे. मी म्हणालो होतो की, भाजप माझा पहिला आणि अखेरचा पक्ष आहे. आणि मी भाजपकडे दोन जागा होत्या, तेव्हापासून पक्षासोबत होतो.

 

Web Title: BJP is not democracy but dictatorial: Shatrughan Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.