...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 08:24 PM2018-09-03T20:24:27+5:302018-09-03T20:33:18+5:30

सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याने भाजपवर टीका होत असून आमदार उमा देवी खाटीक यांनी मुलाच्या कृत्याबद्दल नाराज व्यक्त केली आहे.

bjp mla son threatened to shoot Congress MP Jyotiraditya Scindia | ...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

Next

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांवर दगडफेक केल्याची घटना ताजीच असताना भाजपच्या आमदाराच्या मुलाने काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना गोळी घालण्याची सार्वजनिक धमकीच देऊन टाकली आहे. सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याने भाजपवर टीका होत असून आमदार उमा देवी खाटीक यांनी मुलाच्या कृत्याबद्दल नाराज व्यक्त केली आहे.


मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील हटा विधानसभा मतदारसंघातून उमा देवी खटीक या निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया फिरकल्यास त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडू आणि त्यांना ठार करू अशी धमकीच त्यांच्या मुलाने दिली आहे. प्रिंसदीप असे या मुलाचे नाव असून त्याने ज्योतिरादित्य यांचा एकेरी नावाने उल्लेख केला आहे. 




बुंदेलखंडच्या झाशीच्या राणीचा ज्याने खून केला त्या जिवाजी रावचे तुझ्या अंगात रक्त आहे, जर तू हटा मध्ये प्रवेश करत उपकाशीला अपवित्र करण्याचा प्रयत्न केलास तर गोळी झाडेन, एकतर तुझा मृत्यू नाहीतर माझा मृत्यू होईल, अशा शब्दांत  प्रिंसदीप याने सोशल मिडियावर पोस्ट टाकली आहे, 
सिंधिया हे येत्या 5 सप्टेंबरला हटा जिल्ह्यामध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. या धमकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी सिंधिया यांचे संरक्षण वाढविण्याची मागणी केली आहे. प्रिंसदीपने यापूर्वी भाजपच्याच मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. 

 

या धमकीवर सिंधिया यांनी टीका करताना, भाजपचा खरा चेहरा समोर आला असल्याचे म्हटले आहे. भाजप सरकार त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस नष्ट करण्याचे स्वप्न आहे. अशा धमक्यांमुळे आपण घाबरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: bjp mla son threatened to shoot Congress MP Jyotiraditya Scindia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.