आयेगा तो राहुल गांधी ही; चक्क भाजपा नेत्याने केलं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:37 PM2019-05-20T16:37:47+5:302019-05-20T16:38:20+5:30

मी मदत करु शकत नाही मात्र शेअर करु शकतो. भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आयेगा तो राहुल गांधी ही असं लिहिलेलं आहे.

BJP leader babul supriyo tweet on Rahul Gandhi | आयेगा तो राहुल गांधी ही; चक्क भाजपा नेत्याने केलं ट्विट 

आयेगा तो राहुल गांधी ही; चक्क भाजपा नेत्याने केलं ट्विट 

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची चर्चा देशभरात सुरु आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे भाजपा नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे विरोधी पक्ष एक्झिट पोलच्या आकडेवारीवर भरोसा नाही असं सांगतंय. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी सोमवारी ट्विट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.

भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आयेगा तो राहुल गांधी ही असं लिहिलेलं आहे. त्याचफोटोच्या खालच्या बाजूस थायलँड टुरिजम असा उल्लेख केला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्याने भाजपा खासदाराने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. तसेच ट्विटमध्ये मी मदत करु शकत नाही मात्र शेअर करु शकतो. ज्याने कोणी हे बनवलं आहे तो प्रतिभावंत आहे असं लिहिण्यात आलं आहे. 


रविवारी लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, 'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू असं सांगितले. 

यंदाची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आज तक आणि एक्सिस माय इंडियाने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 19 ते 23 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसची फक्त एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये यंदा कम्युनिस्टांना खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर तृणमूल काँग्रेसलाही 19च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज आहे.  


Web Title: BJP leader babul supriyo tweet on Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.