यूपीत मित्र पक्षाची एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची धमकी, भाजपाच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:52 PM2019-02-10T13:52:00+5:302019-02-10T13:52:41+5:30

लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदी वाढत चालली आहे.

bjp ally suheldev bharatiya samaj party threatens of quitting alliance before 2019 general elections | यूपीत मित्र पक्षाची एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची धमकी, भाजपाच्या अडचणी वाढणार

यूपीत मित्र पक्षाची एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची धमकी, भाजपाच्या अडचणी वाढणार

Next

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदी वाढत चालली आहे. एनडीएतल्या मित्र पक्षांनीही भाजपाच्या नाकीनऊ आणले आहेत. उत्तर प्रदेशमधला भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेवनं भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी भाजपाबरोबर असलेली युती तोडण्याचा इशारा दिला आहे.

राजभर म्हणाले, भाजपानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही त्यांच्याबरोबरची युती तोडू. सामाजिक न्याय समितीच्या शिफारशी 24 फेब्रुवारीपर्यंत लागू न केल्यास आम्ही भाजपापासून वेगळे होऊ. त्यानंतर आम्ही लोकसभेच्या 80 जागांवर उमेदवार उभे करू. आम्ही गरज पडल्यास भाजपाविरोधी असलेल्या सपा-बसपाबरोबरही जाऊ शकतो. त्यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहे. 24 फेब्रुवारीनंतर भाजपाबरोबर कोणताही समझोता करणार नाही. तत्पूर्वी एनपीपीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरोड संगमा यांनी भाजपापासून फारकत घेण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी देशात भाजपा दंगली घडवेल, असं विधानही ओम प्रकाश राजभोर यांनी केलं होतं. 


बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर म्हणाले होते की, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपा देशात दंगली घडवेल, देशात दंगली होऊ शकतात, त्यामुळे जनतेनं हिंदू-मुस्लिमांच्या नावानं भांडू नये, दंगलीत कोणत्याही नेत्याचा नव्हे, तर सामान्य व्यक्तीचाच जीव जातो, असंही त्यांनी अधोरेखित केलं होतं. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला होता. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. 

Web Title: bjp ally suheldev bharatiya samaj party threatens of quitting alliance before 2019 general elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.