संतापजनक! नराधमांनी भर रस्त्यात फाडले मुलीचे कपडे; बिहारमधील व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:35 PM2018-04-30T13:35:34+5:302018-04-30T13:48:57+5:30

मुलीचे कपडे उतरवल्यानंतर या आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून दिले. 28 एप्रिलला हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला.

Bihar Viral video shows girl molested clothes ripped off 4 arrested | संतापजनक! नराधमांनी भर रस्त्यात फाडले मुलीचे कपडे; बिहारमधील व्हिडीओ व्हायरल

संतापजनक! नराधमांनी भर रस्त्यात फाडले मुलीचे कपडे; बिहारमधील व्हिडीओ व्हायरल

Next

पाटणा: कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांचे ओरखडे समाजमनावर ताजे असतानाच आता बिहारमध्ये भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या जेहनाबाद येथे शनिवारी ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार नराधमांनी एका तरूणीला घेरलेले दिसत आहे. हे नराधम तरूणीच्या अंगावरील कपडे फाडत असून निर्लज्जपणे या प्रकाराचे शुटिंग करत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. कथुआ आणि उन्नाव येथील घटनानंतर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करण्यासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. मात्र, बिहारमधील घटना पाहता या विकृत नराधमांना फाशीच्या शिक्षेमुळे खरंच जरब बसेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन जणांचे चेहरे व्हिडीओतील तरूणांशी मिळतेजुळते आहेत तर अन्य दोन जण या घटनेचे शुटिंग करत होते. या चौघांकडून अन्य काही जणांची नावे कळाली आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी अन्य आरोपींना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतल्याची माहिती पाटण्याच्या विभागीय पोलीस महानिरीक्षकांकडून देण्यात आली. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाच तरूण एका मुलीसोबत बळजबरी करताना दिसत आहेत. ही मुलगी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. हे सर्वजण मुलीच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मुलगी गयावया करताना दिसत आहे. या प्रयत्नात ती जमिनीवर जोरात आपटली. मात्र, थोड्यावेळानंतर भानावर येऊन ही मुलगी पुन्हा सुटण्याची धडपड करताना व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. मुलीचे कपडे उतरवल्यानंतर या आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून दिले. 28 एप्रिलला हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर अवघ्या 48 तासांत विशेष तपास पथक स्थापन करून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या एका मोटारसायकलच्या क्रमांकावरून आरोपींचा माग काढण्यात यश मिळाल्याचे समजते. 



 

Web Title: Bihar Viral video shows girl molested clothes ripped off 4 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.