#BigBoss11 : बिग बॉस स्पर्धक एकत्र जाणार पिकनिकला, फायनलनंतरच्या पत्रकार परिषदेत हिना खानचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 05:21 PM2018-01-15T17:21:39+5:302018-01-15T18:38:40+5:30

बिग बॉसच्या ‘घरातून’ बाहेर पडल्यावर हिना खानने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपलं मन मोकळं केलं.

#BigBoss11 : Big Boss finale second runner up heena khan says we all will go for picnic | #BigBoss11 : बिग बॉस स्पर्धक एकत्र जाणार पिकनिकला, फायनलनंतरच्या पत्रकार परिषदेत हिना खानचं स्पष्टीकरण

#BigBoss11 : बिग बॉस स्पर्धक एकत्र जाणार पिकनिकला, फायनलनंतरच्या पत्रकार परिषदेत हिना खानचं स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देहिना खान ही सुरुवातीपासून आक्रमक खेळाडू होती. पण मध्यंतरी तिचा फॅन फॉलोईंग कमी झाला. कधी कधी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐकता, त्यात काहीच स्क्रिप्टेड नसतं.'माझ्या आणि शिल्पाच्या फॅन फॉलोईंगमध्ये जास्त फरक नव्हता. दोघींमध्ये अगदी काही हजार मतांचा फरक होता.’ 

मुंबई : कालच बिग बॉस ११ च्या अंतिम सोहळ्यात चाहत्यांनी शिल्पा शिंदेला विजयी ट्राफीची मानकरी ठरवली आणि तिची सर्वात मोठी स्पर्धक असलेली हिना खान दुसरी रनर अप ठरली. सुरुवातीपासून हिना खान विजयाची खरी दावेदार ठरत होती. मात्र नंतर प्रेक्षकांचा कौल शिल्पाला जात राहीला.  ‘घरातून’ बाहेर पडल्यावर तिने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपलं मन मोकळं केलं.छोट्या पडद्यावरची आदर्श सून असलेली हिना खान फायनलनंतर घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत म्हणाली की, ‘मी या शोमध्ये इतक्या दूरचा पल्ला गाठेन, असा विचारही केला नव्हता. शो सुरु झाला तेव्हा टॉप ५ मध्ये येईन असेही वाटले नव्हते मात्र आज मी फायनलपर्यंत आले आहे आणि दुसरी रनर अप ठरले. मात्र एलिमिनेट होणं माझ्यासाठी सगळ्यात भितीदायक होतं.’

पाहा फोटो - #BigBoss11 : जाणून घ्या बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेचा गेल्या १८ वर्षातला प्रवास

ती पुढे असंही म्हणाली की, ‘बिग बॉसच्या घरात टिकून राहणं फार महत्त्वाचं होतं आणि कठीण होतं. काही स्पर्धक खरंच छान खेळत होते आणि चांगल्या क्षमतेने एकमेकांवर मात देत होते. तिकडे चांगलं वागणं आणि टिकून राहणं गरजेचं होतं मात्र फार कठीण होतं. शेवटी तो शो जिंकणंच सर्व काही नसतं तर त्यातून अनेकांची मन जिंकल्याचा आनंद आहे. त्यातून मी फायनलमध्ये आले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले, यातच सर्व काही झालं. ’ घरात असताना सलमान खान आपल्याशी कसा बोलला आणि तिचं शिल्पासोबतचं नातं कसं होतं याविषयीही ती पत्रकार परिषदेत बोलली. तसंच ती म्हणाली की, ‘माझ्या आणि शिल्पाच्या फॅन फॉलोईंगमध्ये जास्त फरक नव्हता. दोघींमध्ये अगदी काही हजार मतांचा फरक होता.’ शिल्पाच्या जिंकण्याविषयी बोलताना हिना म्हणाली की, ‘एक असा टप्पा आला होता जेव्हा मला आणि विकासला असं वाटत होतं की शिल्पा हा सिझन जिंकु शकते, पण ती आमची एक साधारण चर्चा होती. त्याचा प्रेक्षकांनी काहीही अर्थ काढु नये. कारण त्यानंतरही आम्ही दोघं आमचे १००% देऊन खेळलो.’ 

आणखी वाचा - मराठमोळी शिल्पा शिंदे बनली 'बिगबॉस 11' ची विनर!!

त्या घरातल्या आपल्या स्पर्धकांविषयी बोलताना हिना म्हणाली की, ‘त्या घरात असताना आम्ही भांडलो, वाद केले. बकवास केली आणि बकवास ऐकली मात्र त्या घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही ते सगळं विसरणार आहोत. कारण तो एक शो होता आणि आम्ही स्पर्धक होतो. शेवटी आम्ही माणसं आहोत, कधी कधी आमचा ताबा सुटायचा आणि जे बोलायचं नाही ते बोलून जायचो. मात्र जेव्हा आम्हाला चुकीचा प्रत्यय व्हायचा आम्ही माफी मागायचो. आता तर ते सगळं संपलं आहे आणि आम्ही सगळे आता एका ट्रीपवर जाणार आहोत मात्र जागा कोणती ते मी तुम्हाला नाही सांगु शकत.’ बिग बॉसच्या प्रवासाविषयी विचारल्यावर ती म्हणाली की, ‘हा पुर्ण प्रवास छान होता. मला कोणताच पश्चाताप नाही किंवा संताप नाही. इथून जाताना मी बरंच काही घेऊन जातेय. कधी कधी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. हा एक खेळ होता आणि त्यात सगळं काही चालतं. आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐकता, त्यात काहीच स्क्रिप्टेड नसतं. मात्र काही गोष्टी कापल्या जातात कारण त्या २४ तासातं घडलेल्या घटना तुम्हाला ४५ मिनिटांच्या एपिसोडमध्ये दाखवायच्या असतात.’

पाहा फोटोज - #BigBoss11 : हे आहेत बिग बॉसच्या सर्व ११ पर्वांचे विजेते

हिना खान ही सुरुवातीपासून आक्रमक खेळाडू होती. पण मध्यंतरी बिग बॉसच्या घरात घडलेल्या काही घटनांमुळे शिल्पा शिंदेंचा फॅन फॉलोईंग वाढला. सर्व सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांचा आकडा वाढला आणि त्यासोबतच तिला मिळणारा पाठींबाही वाढला. 

Web Title: #BigBoss11 : Big Boss finale second runner up heena khan says we all will go for picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.