Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:41 AM2018-12-11T10:41:25+5:302018-12-11T10:56:01+5:30

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018: छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

A big blow to the BJP in Chhattisgarh, the Congress got the majority in chhatisgadh | Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत

Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत

Next

रायपूर- छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस 58 जागांवर पुढे असून, भाजपा काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजपा 26 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. अजित जोगी आणि मायावतींची आघाडी दोन जागांवर पुढे असून, अजित जोगींनाही जनतेनं सपशेल नाकारलं आहे.

छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपाच्या रमण सिंह यांचं सरकार आहे. रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जनमानसांत त्यांची चावलवालेबाबा अशीही प्रतिमा तयार झाली होती. परंतु त्यांच्या या प्रतिमेचा भाजपाला फायदा झाला नाही. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये आदिवासींसाठी अनेक योजना पोहोचवल्या होत्या. परंतु तरीसुद्धा भाजपाला जनतेनं झिडकारलं आहे. 

एकीकडे अजित जोगींनी काँग्रेसची साथ सोडून मांडलेली वेगळी चूल आणि मायावतींशी केलेली आघाडी यामुळे काँग्रेसच्या मतांचं धुव्रीकरण होण्याची शक्यता होती. पण अजित जोगी जाऊनही याचा काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही.उलट काँग्रेसला जनतेनं भरभरून मतं दिली आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगाव या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शुक्ला हे कडवी झुंज देत असतानाही राज्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसनं 57 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.  त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.


Web Title: A big blow to the BJP in Chhattisgarh, the Congress got the majority in chhatisgadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.