1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:15 PM2018-08-27T23:15:22+5:302018-08-27T23:23:18+5:30

देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

aviation ministry legalises flying drones in india | 1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील

1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील

Next

नवी दिल्ली- देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं यासंदर्भात एक नियमावली तयार केली असून, ती 1 डिसेंबर 2018पासून लागू होणार आहे. परंतु ड्रोनच्या वापरावर सरकारकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत.

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम(आरपीएएस)च्या वापरासंदर्भात ही नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार एअरस्पेसला तीन नियमांमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या रेड झोन(रेड झोनमध्ये तुम्हाला उड्डाणाची परवानगी नसते.)मध्ये तुम्ही एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय बॉर्डर, दिल्लीचा विजय चौक, राज्यांचे सचिवालय आणि सुरक्षेसंदर्भातील अन्य स्थळांवर ड्रोन उडवू शकत नाही. यल्लो झोन(नियंत्रित वायू क्षेत्र) आणि ग्रीन झोन(ड्रोन उडवण्याची परवानगी)मध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी आहे. तुम्ही ड्रोनचा वापर 400 फुटांच्या उंचीपर्यंत करू शकता, असंही नियमावलीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच ड्रोनबाबतही पाच श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. ज्यात नॅनो ड्रोन-250 ग्रॅम, मायक्रो ड्रोन- 250 ग्रॅमपासून 2 किलो, मिनी ड्रोन- दोन किलोपासून 25 किलो, स्मॉल ड्रोन- 25 किलोपासून 150 किलो आणि लार्ज ड्रोन- 150 किलोंचा सहभाग आहे. विशेष म्हणजे ड्रोन उडवणा-यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाइल अॅपच्या माध्यमातून परवानगी मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. 

Web Title: aviation ministry legalises flying drones in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.