बीएसएफ कॅम्पवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला, तीन अतिरेक्यांचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:03 AM2017-10-04T06:03:21+5:302017-10-04T06:03:55+5:30

श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या शिबिरावर हल्ला करणाºया जैश-ए-मोहम्मदच्या तिन्ही अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी मंगळवारी खात्मा केला.

The attempt of the BSF camp wasted, the death of three terrorists | बीएसएफ कॅम्पवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला, तीन अतिरेक्यांचा खात्मा

बीएसएफ कॅम्पवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला, तीन अतिरेक्यांचा खात्मा

Next

श्रीनगर : श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या शिबिरावर हल्ला करणाºया जैश-ए-मोहम्मदच्या तिन्ही अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी मंगळवारी खात्मा केला. या चकमकीत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.के. यादव यात शहीद झाले, तर बीएसएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. आम्ही आणखी सात अतिरेक्यांचा शोध घेत आहोत. त्यांना लवकरात लवकर पकडणे वा संपवणे आवश्यक आहे, असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले.
हे अतिरेकी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भारतीय सैनिकांच्या वेशात आले. कुंपण कापून त्यांनी बीएसएफच्या शिबिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जैश-ए-मोहम्मदचे आत्मघातकी पथक शहरात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती.
खान म्हणाले की, हे अतिरेकी जैशचा हिस्सा होते. ते याच वर्षी देशात घुसले होते. त्यातील तिघांना पुलवामा येथे २६ आॅगस्ट रोजी मारले. याच गटातील सहा ते सात अतिरेकी अद्याप मोकाट आहेत. तथापि, या अतिरेक्यांना मदत करणाºया नेटवर्कची ओळख पटली आहे. अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्हाला सदैव तत्पर राहावे लागेल. सुरक्षा दलाच्या तयारीमुळे हा अतिरेकी हल्ला हाणून पाडला.

हवाई दलाचे जुने विमानतळही याच भागात आहे. या घटनेमुळे सकाळी तीन तास विमानांची उड्डाणे या भागात बंद करण्यात आली होती. सकाळी १० नंतर विमानांची उड्डाणे सुरू करण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गृहमंत्र्यांकडून कौतुक
अतिरेकी
हल्ला उधळून लावणाºया सुरक्षा दलाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले आहे. वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली असून जखमी दोन जवान धोक्याबाहेर आहेत, असेही ते म्हणाले.

पोलीस शहीद : पुुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस शिपाई आशिक अहमद सोमवारी रात्री शहीद झाले. अवंतीपोरा येथून विवाह समारंभाहून परतत असताना अतिरेक्यांनी त्यांना लक्ष्य केले.

Web Title: The attempt of the BSF camp wasted, the death of three terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.