दिल्लीतील 'त्या' टॅक्सीचालकाने यापूर्वीही केला होता अत्याचार

By admin | Published: December 8, 2014 10:29 AM2014-12-08T10:29:45+5:302014-12-08T10:35:06+5:30

एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा टॅक्सी चालक यादवने यापूर्वीही असे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून त्या गुन्ह्यासाठी त्याने ७ महिन्यांची शिक्षाही भोगली आहे.

The atrocities committed by the taxi driver in Delhi have been done earlier | दिल्लीतील 'त्या' टॅक्सीचालकाने यापूर्वीही केला होता अत्याचार

दिल्लीतील 'त्या' टॅक्सीचालकाने यापूर्वीही केला होता अत्याचार

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ८ - एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा टॅक्सी चालक यादवने यापूर्वीही असे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून त्या गुन्ह्यासाठी त्याने ७ महिन्यांची शिक्षाही भोगली आहे.  २०११ साली त्याने लैंगिक अत्याचार केला होता, असे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. 
आरोपी शिवकुमार यादव (३२) हा एका आंतरराष्ट्रीय कॅब बुकिंग सर्व्हिस उबेरचा टॅक्सीचालक आहे. तो उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील रहिवासी आहे. पीडित महिला शुक्रवारी रात्री यादवच्या टॅक्सीत बसून घरी परत जात होती. शिवकुमार याने टॅक्सी एका निर्जन स्थळी थांबविली व टॅक्सीचे दार व खिडक्या लॉक केल्या. त्यानंतर त्याने प्रवासी महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी यादवला रविवारी मथुरा येथून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने २०११ सालीही असा गुन्हा केला होता व त्याप्रकरणी त्याने सात महिने तुरूंगातही काढले होते. मात्र यामुळे टॅक्सी कंपन्या कामावर ठेवण्यापूर्वी चालकांची पार्श्वभूमी तपासून पाहतात की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
दरम्यान बलात्काराच्या या प्रकरणांनतर दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. तर बलात्काराची ही घटना अतिशय दुर्दैवी व शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली.

Web Title: The atrocities committed by the taxi driver in Delhi have been done earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.