पोस्टमॉर्टेमसाठी मागितले ३०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:07 AM2018-05-17T05:07:37+5:302018-05-17T05:07:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा मंगळवारी खांब कोसळून जे लोक मरण पावले, त्यांच्या पोस्टमॉर्टेमसाठी ३०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचे व्हिडीओमुळे उघडकीस आले आहे.

Asked for post mortem Rs. 300 | पोस्टमॉर्टेमसाठी मागितले ३०० रुपये

पोस्टमॉर्टेमसाठी मागितले ३०० रुपये

googlenewsNext

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा मंगळवारी खांब कोसळून जे लोक मरण पावले, त्यांच्या पोस्टमॉर्टेमसाठी ३०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचे व्हिडीओमुळे उघडकीस आले आहे. त्यानंतर, रुग्णालयातील त्या कर्मचा-याला पोलिसांनी अटक केली.
जितेंद्र यादव यांचे नातेवाईक दुर्घटनेत ठार झाले आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संकुलातील रुग्णालयातील कर्मचारी पोस्टमॉर्टेमसाठी ३00 रुपये लाच घेत असल्याचे व्हिडीओत दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. अन्य मृतांच्या नातेवाईकांकडूनही लाच घेतल्याचे सांगण्यात आले. लाच न दिल्यास मृतदेह आहे तसेच परत पाठवू रुग्णालयाने नातेवाईकांना ऐकवले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर कर्मचाºयाला अटक केली गेली. या अपघातप्रकरणी उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनच्या काही अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. सरकारच्या बांधकाम विभागाचे मुख्य प्रकल्प अधिकारी एच. सी. तिवारी यांच्यासह चार अधिकाºयांना निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)
>निकृष्ट कारभारामुळे प्रश्नचिन्ह
उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनने केवळ देशातच नव्हे तर इराक, नेपाळ, येमेन या देशांतही पुलबांधणीची कामे केली आहेत. सरकारी मालकीच्या या कॉर्पोरेशनने २०१० साली बुंदेलखंड भागात बांधलेल्या एका पुलाचे उद््घाटन झाल्यानंतर तेरा दिवसांतच त्याला तडे गेले होते.
लखनौ येथे बांधलेल्या एका पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले होते. आता वाराणसीमध्ये पुलाची दुर्घटना घडल्यामुळे उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Asked for post mortem Rs. 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.