ईडीच्या चौकशीत केजरीवाल यांनी घेतली दोन मंत्र्यांची नावं, म्हणाले, विजय नायर त्या दोघांना रिपोर्ट करायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 02:57 PM2024-04-01T14:57:22+5:302024-04-01T14:57:44+5:30

Arvind Kejriwal News: कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणी आज राऊंज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी झालीय त्यावेळी अरविंद केजरीवाल हे  दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला.

Arvind Kejriwal names Atishi and Saurabh Bhardwaj in ED inquiry, says Vijay Nair used to report to them | ईडीच्या चौकशीत केजरीवाल यांनी घेतली दोन मंत्र्यांची नावं, म्हणाले, विजय नायर त्या दोघांना रिपोर्ट करायचे

ईडीच्या चौकशीत केजरीवाल यांनी घेतली दोन मंत्र्यांची नावं, म्हणाले, विजय नायर त्या दोघांना रिपोर्ट करायचे

कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणी आज राऊंज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी झालीय त्यावेळी अरविंद केजरीवाल हे  दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला.

आजच्या सुनावणीवेळी ईडीकडून एएसजी राजू तर केजरीवाल यांच्याकडून रमेश गुप्ता यांनी बाजू मांडली. ईडीचे वकील कोर्टात युक्तिवाद करत असताना अरविंद केजरीवाल हे तिथे उपस्थित होते. चौकशीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी विजय नायर हे मला नाही तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचे, अशी माहिती दिल्याचे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले अरविंद केजरीवाल हे गप्प राहिले. दरम्यान, आतिशी ह्या गोवा विधानसभा निवडणुकीवेळी आपच्या गोव्यातील प्रभारी होत्या.  

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम केलेलं असूनही विजय नायर यांनी तिथे काम करणाऱ्या लोकांबाबत माहिती नसल्याचा दावा विजय नायर यांनी का केला, या प्रश्नाचं उत्तर देणं केजरीवाल यांनी टाणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीबाबत आतिशी यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.  

Web Title: Arvind Kejriwal names Atishi and Saurabh Bhardwaj in ED inquiry, says Vijay Nair used to report to them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.