'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:26 PM2019-04-08T17:26:40+5:302019-04-08T17:27:08+5:30

लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे.

article 370 and 35a will pave the way for azadi warns farooq abdullah lok sabha election 2019 | '...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

Next

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचं भाजपानं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर इशारा दिला आहे.

जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर आमच्यासाठी स्वातंत्र्य होणं अधिक सोपं जाईल, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांना ते कलम हटवायचं आहे, त्यांना वाटतं बाहेरून माणसं आणून इथे त्यांना वास्तव करायला देऊ, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपा काढत राहू?, त्यांना असं वाटतं. आम्ही त्यांच्याशी दोन हात करू, 370 कलम कसं हटवतात ते पाहतोच?, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वातंत्र्य होऊ, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.


स्वतःचं मत स्पष्ट करताना त्यांनी भाजपाला 370 कलम न हटवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपानं असं काहीही करू नये, जेणेकरून तुम्ही आमच्या हृदयावर घाव कराल. असं केल्यास आम्ही भारतापासून स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारू, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. . तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात भाजपा कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Web Title: article 370 and 35a will pave the way for azadi warns farooq abdullah lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.