घोटाळेबाज नितीन संदेसराचा साथीदार हितेश पटेल अल्बानियाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:52 PM2019-03-22T13:52:31+5:302019-03-22T13:53:20+5:30

गुजरातच्या बडोद्यातील स्टर्लिंग बायोटेक औषध कंपनीच्या मालकाला तब्बल 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्या प्रकरणात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुबईत अटक करण्यात आली होती.

Andhra Bank scam : Hitesh Patel detained in Albania | घोटाळेबाज नितीन संदेसराचा साथीदार हितेश पटेल अल्बानियाच्या ताब्यात

घोटाळेबाज नितीन संदेसराचा साथीदार हितेश पटेल अल्बानियाच्या ताब्यात

Next

मुंबई : आंध्रा बँकेद्वारा चालविण्यात येत असलेल्या बँकांच्या समुहाला 5 हजार कोटींचा चुना लावत परदेशात पलायन केलेल्या स्टर्लिंग ग्रुपच्या संचालकांपैकी एक असलेल्या हितेश पटेल याला अल्बानियात ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने नुकतीच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. 


गुजरातच्या बडोद्यातील स्टर्लिंग बायोटेक औषध कंपनीच्या मालकाला तब्बल 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्या प्रकरणात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुबईत अटक करण्यात आली होती. नितीन संदेसरा असे या ठगाचे नाव असून त्याने व त्याचा भाऊ चेतन याने आंध्रा बँकेद्वारा चालविण्यात येत असलेल्या बँकांच्या समुहाला 5 हजार कोटींचा चुना लावला आहे. नितीन याच्या अटकेमुळे या घोटाळ्याशी असलेले राजकीय संबंधही उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. नितीन याच्याविरोधात उच्च न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढला होता. या आधारावर दुबईच्या पोलिसांनी त्याला अटक केली. दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार होते. 


आता त्यांचा साथीदार असलेला हितेश पटेल याला 20 मार्चला अल्बानियातील तपास यंत्रणा राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन तिराना यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात 11 मार्चला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अल्बानियातील कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 


भारतात हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे 31 उद्योगपती परदेशात फुर्रर झाले आहेत.नितीन संदेसरा हा बँकांना चुना लावून परदेशात पलायन केलेल्या 31 उद्योगपतींपैकी एक आहेत. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वीच दोन्ही भाऊ आपल्या परिवारांसह गेल्या वर्षीच देश सोडून पळाले होते. इडीदेखील या दोघांच्या मागावर होती. तसेच त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती.




चोक्सीचे आजारपण
दरम्यान, नीरव मोदीचा साथीदार मोहूल चोक्सीही परदेशात असून त्यांने त्याच्या भारतातील वकिलाद्वारे पीएमएलए न्यायालयात नवीन अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्याने जुनाट हृदयरोग असल्याचा दावा केला आहे. तसेच पायात दुख असून मेंदूमध्येही रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे म्हटले आहे. 


 

Web Title: Andhra Bank scam : Hitesh Patel detained in Albania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.