‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:50 AM2024-04-11T05:50:09+5:302024-04-11T05:50:34+5:30

मंत्री आनंद यांचा राजीनामा; गेल्या वर्षी पडल्या ईडीच्या धाडी

An indication of 'Aap''s collapse?; Minister Anand resigns after ED raid | ‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : ईडीने केलेली अटक वैध ठरवून दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन २४ तास लोटत नाही तोच त्यांचे सहकारी समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला गळती लागण्याचे संकेत दिले.

आपले नाव भ्रष्टाचाराशी जोडले जाऊ नये, म्हणून राजीनामा दिल्याचे आनंद यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आनंद यांच्या निवासस्थानासह नऊ ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या.

ईडी अटकेविरोधात केजरीवाल सुप्रीम कोर्टात
केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविणाऱ्या दिल्ली कोर्टाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची तत्काळ दखल घेणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पण, त्यांनी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.

२६ एप्रिलला आणखी एक  अग्निपरीक्षा
चौफेर संकटांनी घेरलेल्या आपला दिल्लीत महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकींमुळे आणखी एका अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही निवडणूक २६ एप्रिल रोजी होणार असून, दोन्ही पदांवर विजयी होण्यासाठी भाजपकडून ‘आप’ची पूर्ण कोंडी होणार हे स्पष्ट आहे.

‘आप’चा भाजपवर पलटवार  
nज्या राजकुमार आनंद यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यापासून सर्व बडे भाजपचे नेते भ्रष्टाचाराचा आरोप करीत होते त्या आनंद यांचे हार घालून भाजपमध्ये स्वागत होते की नाही, हे आता लवकरच दिसणार आहे, अशा शब्दांत पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी भाजपवर पलटवार केला. या लढाईत आमचे काही लोक कच खातील. 
nआमचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा आम्ही करीत होतो, तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते. पण, आज आमचा दावा खरा ठरला आहे, असे संजय सिंह म्हणाले. 

Web Title: An indication of 'Aap''s collapse?; Minister Anand resigns after ED raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.