'अहो अमित मालवीय, आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही सांगा'; सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:33 PM2018-03-28T12:33:54+5:302018-03-28T12:33:54+5:30

अमित मालवीय म्हणजे भाजपाचे स्टीव्ह स्मिथ आहेत.

Amit Malviya please tell 2019 Lok Sabha election dates troll on social media after announcing Karnataka Poll Dates Before EC | 'अहो अमित मालवीय, आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही सांगा'; सोशल मीडियावर खिल्ली

'अहो अमित मालवीय, आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही सांगा'; सोशल मीडियावर खिल्ली

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाच्या आधीच ट्विटवरून कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर करणाऱ्या अमित मालवीय यांच्यामुळे भाजपाची सध्या चांगलीच पंचाईत झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण यावरून मालवीय यांच्यासकट भाजपाला ट्रोल करत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर भाजपाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. अमित मालवीय यांनी 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीच्याआधारे हे ट्विट केले, असे भाजपाचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले. परंतु, त्यानंतरही ट्विटरवर अमित मालवीय यांना अनेकांकडून ट्रोल केले जात आहे. 

भाजपाचा उतावळेपणा! निवडणूक आयोगाआधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख

'मालवीय आता तुम्ही लोकसभा निवडणुकांची तारीख आणि निकालही जाहीर करून टाका', 'अमित मालवीय हे आहेत', 'अमित मालवीय म्हणजे भाजपाचे स्टीव्ह स्मिथ आहेत', अशा मजेशीर प्रतिक्रियांचा सध्या ट्विटरवर पाऊस पडत आहे. 



















Web Title: Amit Malviya please tell 2019 Lok Sabha election dates troll on social media after announcing Karnataka Poll Dates Before EC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.