चाळिशीनंतर आवडते ‘अकेले हम अकेले तुम’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:01 PM2023-02-16T12:01:27+5:302023-02-16T12:01:50+5:30

महत्त्वाकांक्षी लोकांना पाहिजे ‘आजादी’

'Akele Hum Akele Tum' Favorite After 40 | चाळिशीनंतर आवडते ‘अकेले हम अकेले तुम’

चाळिशीनंतर आवडते ‘अकेले हम अकेले तुम’

googlenewsNext

वॉशिंगटन : मोबाइल क्रांतीने विश्व जवळ आणले असताना जवळचे लोक मात्र दूर नेले असा आरोप करण्यात येतो. एकटेपणाची शिकार झालेले अनेक जण ‘मोबाइल ऑडिक्ट’ श्रेणीतील निघतात. असे असले तरी आता चाळिशीनंतरचे पुरुष-महिला ‘अकेले हम अकेले तुम’ असे दु:खाने नाही तर आनंदाने म्हणत आहेत. अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील एकूण प्रौढांपैकी ४० टक्के एकटे राहत आहेत. त्यापैकी निम्म्या प्रौढांना तर डेटिंग ॲप किंवा तात्पुरते रिलेशनही नकोसे झाले आहे. 

यापुढे लग्न आवश्यक नाही...
एकटे राहण्याची इच्छा का वाढत आहे याचा शोध घेण्यासाठी एकटे राहणाऱ्यांच्या कथा संग्रहित करत आहोत. अनेक दशकांपासून विवाहांचे प्रमाण कमी होत आहे. कुटुंब निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक स्थैर्यासाठी लग्न यापुढे आवश्यक नाही. प्रेमसंबंधांमध्ये राहणारे लोक एकटे राहणाऱ्यांपेक्षा चांगले जीवन जगतात. ते त्यांच्या जीवनात अधिक आनंदी आणि समाधानी आहेत.  वैवाहिक जीवन चांगले नसलेल्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य खराब असते.

जितके महत्त्वाकांक्षी तितकेच एकटे राहायची इच्छा 
१९९० मध्ये अमेरिकेमध्ये एकटे राहणाऱ्या प्रौढांची संख्या २९% होती. घटस्फोटामुळे एकटे राहणाऱ्या ३९% प्रौढांचा या अभ्यासात समावेश नव्हता. टोरँटो विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक ज्योफ मॅकडोनाल्ड त्यांच्या संशोधनात स्पष्ट करतात की, वयाच्या चाळिशीनंतर पुरुषांमध्ये एकटे राहण्याची इच्छा वाढते. त्यात ते अधिक आनंदी राहतात. सेंट बार्बरा येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय सामाजिक मानसशास्त्रज्ञ बेला डीपॉलो म्हणतात की जितके जास्त महत्त्वाकांक्षी लोक तितकेच एकटे राहण्याची इच्छा असते. विशेषतः महिलांना.

कारण काय?
जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक एलियाकीम किस्लेव्ह म्हणतात २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार एकटे राहण्याचे मोठे कारण म्हणजे स्वातंत्र्य आहे. एकटे राहिल्यास स्वतःला जास्त वेळ देऊ शकतील. ध्येय पूर्ण करण्यास सक्षम होतील.

Web Title: 'Akele Hum Akele Tum' Favorite After 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.