अहमद पटेल काँग्रेसचे नवे खजिनदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:01 AM2018-08-22T02:01:58+5:302018-08-22T02:02:18+5:30

राहुल गांधी यांच्याकडून संघटनेत मोठे बदल

Ahmed Patel new treasurer of Congress | अहमद पटेल काँग्रेसचे नवे खजिनदार

अहमद पटेल काँग्रेसचे नवे खजिनदार

Next

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेत काही महत्त्वाचे बदल मंगळवारी केले. त्यानूसार मोतीलाल व्होरा यांच्या जागी काँग्रेसचे नवे खजिनदार म्हणून ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांचा मंगळवारी वाढदिवस होता त्यामुळे ही घोषणा त्यांच्यासाठी एक प्रकार विशेष भेटच ठरली.
अहमद पटेल यांनी याआधी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव म्हणून १९९६ ते २००० या कालावधीत काम पाहिले होते. गेली २० वर्षे खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मोतीलाल व्होरा यांची नियुक्ती आता या पक्षाच्या प्रशासन सरचिटणीसपदी झाली आहे. हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख करणसिंग यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमारी यांना पक्षकार्यकारिणीच्या कायमस्वरुपी निमंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आसाम वगळता इशान्य भारतातील सर्व राज्यांसाठीचे काँग्रेस सरचिटणीस व प्रभारी सी. पी. जोशी यांच्याकडील पदभार काढून त्यांच्या जागी लुईझिन्हो फालेरो यांना नेमण्यात आले आहे.

Web Title: Ahmed Patel new treasurer of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.