AgustaWestland: यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही- मिशेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 02:36 PM2018-12-06T14:36:56+5:302018-12-07T00:41:36+5:30

अगुस्टा वेस्टलँडकडून यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही.

agusta westland christian michel Says Bribe Was Consultant Fee | AgustaWestland: यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही- मिशेल

AgustaWestland: यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही- मिशेल

Next

नवी दिल्ली: अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली दिल्याचा ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलवर आरोप आहे. परंतु यूपीए सरकारला कोणत्याही प्रकारची लाच मी दिली नाही, असं मिशेल म्हणाला आहे. यूपीएमधील मंत्री किंवा संरक्षण मंत्रालयाला पैसे दिल्याचा आरोप मिशेलनं पूर्णपणे फेटाळला आहे. यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही, असंही त्याने स्पष्ट केलं आहे. 

अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलवर लाचखोरीचा आरोप आहे. मात्र त्यानं चौकशीत लाचखोरी संबंधित कोणत्याही व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नेत्यांना आणि नोकरशहांना लाच दिल्याच्या प्रकरणात गाइडो हाशके नावाच्या एका युरोपीय दलालानं नोट्स लिहिल्याची माहिती त्यानं दिली. 'व्हीव्हीआयपी चॉपर डिलमध्ये सोनिया गांधी या मध्यस्थी आहेत. त्यामुळे भारतात अगुस्टा वेस्टलँडचे सेल्समन पीटर हुलेट यांनी सोनिया गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी आणि सोनिया यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना टार्गेट करायला हवं,' असा उल्लेख त्या नोट्समध्ये होता, अशी माहिती त्या नोट्समध्ये असल्याचं मिशेलनं अधिकाऱ्यांना दिली. 

हाशकेनं या प्रकरणात आपल्याला फसवल्याचा आरोप मिशेलनं केला. या प्रकरणातील 'बजेट खर्च' नावाखाली तयार करण्यात आलेल्या नोट्सची माहितीदेखील त्यानं दिली. 'काही लोकांना एकूण 30 मिलियन युरोची लाच देण्यात आली होती. या व्यक्तींच्या नावातील काही अक्षरं या नोट्समध्ये होती. FAM, AP अशा सांकेतिक शब्दांसोबत POL असं शीर्षक लिहिण्यात आलं होतं,' अशी माहिती मिशेलनं तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. 
 

Web Title: agusta westland christian michel Says Bribe Was Consultant Fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.