Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 05:20 PM2022-06-17T17:20:56+5:302022-06-17T19:11:42+5:30

अनेक संघटना या आंदोलनात उतरल्या असून या आंदोलनानं अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे.

agneepath scheme protest live and latest updates uttar pradesh bihar rajasthan bharat band | Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट

Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट

googlenewsNext

Agneepath Agneeveer Protest: लष्करात कंत्राटी पद्धत आणणारी अग्निपथ योजना केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी, या प्रश्नावर बिहारमधील विद्यार्थी-युवा संघटना AISA-INOS, रोजगार संघर्ष युनायटेड फ्रंट आणि लष्कर भरती जवान मोर्चा यांनी भूमिका घेतली आहे. अनेक संघटना या आंदोलनात उतरल्या असून या आंदोलनानं अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. अनेक ठिकाणी ट्रेनच्या डब्यांनाही आगीच्या भक्ष्यस्थानी टाकण्यात आलं आहे. दरम्यान, आंदोल करणाऱ्या एका समुहानं उद्या भारत बंदचं आवाहन केलं आहे. तसंच बिहारमधील महाआघाडीतील एका पक्षानं या भारत बंदला समर्थनही दिलं आहे.

बिहारमधील नालंदा येथील इस्लामपूर रेल्वे स्थानकावर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थ्यांनी स्थानकावर उभ्या असलेल्या मगध एक्सप्रेसच्या ४ बोगी पेटवून दिल्या. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यानंतर स्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर दुसरीकडे बिहारच्या बिहिया रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवरून आंदोलकांनी सुमारे तीन लाख रुपये लुटले. याशिवाय जीआरपीमध्येही आंदोलकांनी लूटपाट केली.

तेजस्वी यादवांचा निशाणा
बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी 'अग्निपथ' योजनेवर निशाणा साधला आहे. ४ वर्षांच्या करारावर बहाल केलेल्या अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे वर्षभरात ९० दिवसांची रजा मिळणार का? अग्निपथ योजनेत कंत्राटी अधिकाऱ्यांची भरती का केली जात नाही, असा प्रश्न तेजस्वी यांनी उपस्थित केला. फक्त कंत्राटी सैनिकांचीच भरती का? सुशिक्षित तरूणांसाठी ही मनरेगा योजना आहे का? असा सवालही त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात १०० जणांना अटक
उत्तर प्रदेशातील बलिया येथे अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी १०० जणांना अटक केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंदोलनात सहभागी आंदोलकांची ओळख पटवत आहेत. यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही असा इशारा बिलायाच्या डीएम यांनी दिला.

 

Web Title: agneepath scheme protest live and latest updates uttar pradesh bihar rajasthan bharat band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.