निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:19 AM2024-01-29T06:19:59+5:302024-01-29T06:20:18+5:30

Indian Army: ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत.

After retirement, job opportunities are available here, corporate houses are also looking at retired army personnel | निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर

निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर

नवी दिल्ली - वर्दी घातलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांवर जगाची नजर असते; पण आता कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर आहे. ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात निवृत्त लष्करी जवानांची भरती करत आहेत.  या योजनेंतर्गत निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम करत आहे. त्यांची विविध पदावर नियुक्ती केली जात आहे.

- ॲमेझॉन इंडिया : हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोकरी
- टाटा मोटर्स : समूहाने माजी सैनिकांच्या भरतीसाठी आराखडा तयार केला आहे.
- ओएनजीसी : कंपनीच्या मुख्यालयात ८० माजी लष्करी कर्मचारी नियुक्त.
- फ्लिपकार्ट : गेल्या वर्षी ५६ माजी लष्करी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. कंपनीत सध्या २०० माजी सैन्य कर्मचारी कार्यरत.
- जेपी मॉर्गन चेज : समूहात आर्थिक, संचालन तसेच विविध समूहांत माजी लष्करी कर्मचारी.
- विश्व समुद्र समूह : समूहात सध्या अनेक माजी लष्करी कर्मचारी. नवीन कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती सुरू आहे.

काम काय?
ॲमेझॉन इंडियाने संरक्षण मंत्रालयासोबत करार केला आहे. ते नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. 
गेल्या वर्षी ५६ निवृत्त लष्करी कर्मचारीही फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये सामील झाले होते. तर ओएनजीसीचे प्रवक्ते म्हणाले की, कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयात ८० लष्करी कर्मचारी जोडले गेले आहेत. हे कर्मचारी सुरक्षा, प्रशासन, तपासणी आणि अतिरिक्त सेवेसाठी काम करत आहेत. 

Web Title: After retirement, job opportunities are available here, corporate houses are also looking at retired army personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.