बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही होणार दारूबंदी

By admin | Published: April 10, 2017 06:30 PM2017-04-10T18:30:13+5:302017-04-10T19:59:42+5:30

बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही दारूबंदी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यात राज्यातील दारूची दुकानं बंद करण्यात येतील

After Bihar, now the Madhya Pradesh will also be a liquor vendor | बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही होणार दारूबंदी

बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही होणार दारूबंदी

Next
>ऑनलाइन लोकमत
राजस्थान, दि. 10 - बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही दारूबंदी होणार आहे. टप्प्याटप्प्यात राज्यातील दारूची दुकानं बंद करण्यात येतील असं मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री चौहान यांनी याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मध्य प्रदेशमध्ये दारू विक्रेत्यांचं धाबं दणाणलं आहे.  
 
 लवकरच राज्यात दारूबंदी केली जाईल, टप्प्याटप्प्यांमध्ये राज्यातील दारूची दुकानं बंद केली जातील असं चौहान म्हणाले. पहिल्या टप्प्यात नर्मदा नदीपासून 5 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात दारूबंदी केली जाईल. विरोधी पक्षांकडून चौहान सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे. जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी उचलण्यात आलेलं पाऊल असं विरोधीपक्षाने म्हटलं आहे. 

Web Title: After Bihar, now the Madhya Pradesh will also be a liquor vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.