'आला रे आला, १५ लाखांचा चेक आला'; संसदेबाहेर झालं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:40 PM2019-02-12T13:40:34+5:302019-02-12T13:45:07+5:30

आज संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात कुठलाही गाजावाजा न करता 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सुरू झाले.

After all, a check of 15 lakhs came! Allocated near of Parliament | 'आला रे आला, १५ लाखांचा चेक आला'; संसदेबाहेर झालं वाटप

'आला रे आला, १५ लाखांचा चेक आला'; संसदेबाहेर झालं वाटप

googlenewsNext

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्ष आणि सर्वसामान्यांकडून सातत्याने होत असते. त्यावरून मोदी आणि भाजपावर टीकाही केली जाते. मात्र आज संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात कुठलाही गाजावाजा न करता 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सुरू झाले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्या 15 लाख रुपयांच्या चेकमागचे खरे कारण वेगळेच होते. 

त्याचे झाले असेकी, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात विरोध प्रदर्शन करून निषेध नोंदवला. त्यावेळी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेल्या 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटपही केले. संसद भवन परिसरामध्ये विरोध करत असलेली मंडळी हे चेक हातात घेऊन उभी होती.  

खरंतर हे चेक नकली होते. मात्र खऱ्या चेकप्रमाणे त्यांची रचन करण्यात आली होती. मात्र त्यावर कुठल्याही बँकेचे नाव न टाकता फेकू बॅक असे नाव टाकण्यात आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि सहीसुद्धा ठेवण्यात आली होती. 



 दरम्यान, काँग्रेसच्या खासदारांनी हे चेक भाजपाच्या नेत्यांना देण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांनी चेक न घेताच जाणे पसंद केले. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचा दावा करून ते 15 लाख रुपये खात्यात जमा करण्याची मागणी सातत्याने करत असतात. मात्र मोदींनी तसे कुठलेही आश्वासन दिल्याचे भाजपा नेते नाकारतात. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्येही 15 लाख रुपये देण्याबाबत उल्लेख नव्हता. मात्र असे असले तरी विरोधक या 15 लाख रुपयांवरून मोदी सरकारची कोंडी करत असतात. 

Web Title: After all, a check of 15 lakhs came! Allocated near of Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.