हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:59 AM2017-10-27T06:59:51+5:302017-10-27T07:01:52+5:30

बंगळुरू : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले.

Abdul Karim Telgi, the founder of the fake stamp scam of thousands of crores, passed away | हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

बंगळुरू : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले. तेलगी येथील कारागृहात ३० वर्षांची शिक्षा भोगत होता. अनेक वर्षे व्याधींनी जर्जर ५६ वर्षांच्या तेलगीला १० दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल केले होते.
उद्या, शुक्रवारी खानापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. तेलगीचा मुद्रांक घोटाळा १९९९ मध्ये उघड झाला व २००१ मध्ये त्याला अटक झाली. तेलगीला ३० वर्षांच्या कारावासासह २०२ कोटी रुपये दंडाची शिक्षा झाली. तेलगीने हर्षद मेहताच्या रोखे घोटाळ्याच्या काळात हजारो कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून विकले. तेव्हा तो राजेशाही थाटात राहायचा. अनेक नेते व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा त्याला वरदहस्त होता. त्यापैकी काही अधिकाºयांना अटकही झाली होती. मात्र नंतर क्लीन चिट मिळाली. छगन भुजबळ यांचे नावही त्याने नार्को टेस्टमध्ये घेतले होते. (वृत्तसंस्था)
>दोन घोटाळे, दोन मृत्यू
तेलगीचा मुद्रांक घोटाळा व हर्षद मेहताचा रोखे घोटाळा हे गाजलेले त्या काळातील महाघोटाळे. दोन्ही घोटाळ्यांच्या सूत्रधारांचा मृत्यू तुरुंगात झाला. हर्षद मेहताचा मृत्यू ठाणे तुरुंगात तर तेलगीचा मृत्यू शिक्षा भोगत असताना झाला.

Web Title: Abdul Karim Telgi, the founder of the fake stamp scam of thousands of crores, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.