असा साप जो पहिल्यांदाच दिसला!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:14 AM2024-01-14T09:14:33+5:302024-01-14T09:14:45+5:30

मिझोराम विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक एच.टी. लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून याला सिनोमिक्रूरस गोरेई, असे नाव दिले आहे.

A snake that was seen for the first time!, know what are the features? | असा साप जो पहिल्यांदाच दिसला!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

असा साप जो पहिल्यांदाच दिसला!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

आयझॉल : मिझोराम विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी राज्यात कोरल सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढण्यात यश मिळविले आहे. मिझोराम विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक एच.टी. लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून याला सिनोमिक्रूरस गोरेई, असे नाव दिले आहे.

लालरेमसांगा यांच्यासह लालबियाकझुआला आणि इतर संशोधकांनी प्रवाळ सापांच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. यात इतर राज्यांतील संशोधकांनीही मोलाची मदत केली आहे. (वृत्तसंस्था) 

काय आहेत वैशिष्ट्ये?
अभ्यासात असेही दिसून आले आहे की, सिनोमिक्रूरस मॅक्लेलँडी एका वेळी ६ ते १४ अंडी घालू शकते, तर सिनोमिक्रूरस गोरी तीन अंडी घालते. 
मिझोराममध्ये, सिनोमिक्रूरस मॅक्लेलँडी प्रामुख्याने डोंगराळ किंवा उंच भागात आढळतात, तर सिनोमिक्रूरस गोरेई डोंगराळ भागात आढळतात.

Web Title: A snake that was seen for the first time!, know what are the features?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप