एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:56 AM2018-09-19T05:56:27+5:302018-09-19T06:56:15+5:30

प्रमाण घटत असल्याचा युनोचा निष्कर्ष

8 lakh children in a year; The shocking reality in India | एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

Next

नवी दिल्ली : भारतामध्ये २०१७ साली ८ लाख २ हजार बालकांचा मृत्यू ओढविला. हे प्रमाण पाच वर्षांच्या तुलनेत कमी आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

२०१७ साली ६ लाख ५0 हजार नवजात बालके व ५ ते १४ वर्षे वयोगटातील १ लाख ५२ हजार बालके मरण पावली. युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी यास्मिन अली हक म्हणाल्या की, बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण घटत असून ही चांगली बाब आहे. नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांचे प्रमाण वाढत आहे. २०१६ रोजी ८ लाख ६७ हजार बालके मरण पावली होती. मात्र हे प्रमाण त्याच्या पुढच्या वर्षी कमी झाले. सन २०१६ साली बालमृत्यूचे प्रमाण दर हजार बालकांमागे ४४ इतके होते. याउलट २०१७ मध्ये लहान मुलींच्या मृत्यूचे प्रमाण दर हजारामागे ४० व मुलांमध्ये दर हजारामागे ३९ इतके होते. लहान मुलींच्या मृत्यूदरात घट झाली, असेही यास्मिक हक म्हणाल्या.

पाच सेकंदांना एक मृत्यू
२०१७ साली भारतामध्ये १५ वर्षे वयाखालील ६३ लाख मुले दर पाच सेकंदांना एक यानुसार मरण पावली. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाले असते, तर ती वाचू शकली असती असे युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या विभाग, जागतिक बँक यांनी मृत्यूदरासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Web Title: 8 lakh children in a year; The shocking reality in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू