50 हजार यूपी, बिहारवाले गुजरातबाहेर; चिमुरडीवरील बलात्कारानंतर गुजरातींचा हिसका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:28 PM2018-10-08T12:28:12+5:302018-10-08T12:29:57+5:30

साबरकांठा येथे एका 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेतील

50 thousand UP, Biharis out of Gujarat; After the rape of minor girl in Gujarat | 50 हजार यूपी, बिहारवाले गुजरातबाहेर; चिमुरडीवरील बलात्कारानंतर गुजरातींचा हिसका

50 हजार यूपी, बिहारवाले गुजरातबाहेर; चिमुरडीवरील बलात्कारानंतर गुजरातींचा हिसका

Next

अहमदाबाद - युपी बिहारी किंवा परप्रांतीय नागरिकांविरुद्ध आता गुजरातमध्येही आवाज उठला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. तर, युपी-बिहारी नागरिकांना लवकरात लवकर गुजरात सोडून देण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबतचे काही व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, जवळपास 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे समजते. 

साबरकांठा येथे एका 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी कामगार हा मूळ बिहारचा रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानंतर, गुजराती नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे राज्यातील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच गुजरातमध्ये सुरू झाली. पाहता-पाहता या आंदोलनाने मोठ रुप धारण केले असून अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 42 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 342 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील 6 जिल्ह्यांमध्ये या घटना प्रकर्षाणे जाणवत आहेत. त्यापैकी मेहसाणा जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल झाले आहेत. तेथून 89 जणांना अटक करण्यात आली आहे. यांसह सोशल मीडियावर हिंसात्मक पोस्ट शेअर करणाऱ्या 6 जणांनाही अटक केली आहे. 

गुजरातमधील ठाकूर सेनेने सर्वप्रथम युपी व बिहारी नागरिकांविरुद्ध आवाज उठवला. तसेच या लोकांना येथे नोकरी न देण्याचे आवाहन करत त्यांना मारहाणही केली. त्यानंतर सोशल मीडियावरुन ही चळवळ तीव्र होऊन राज्यभर याचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे. मात्र, सणानिमित्त हे नागरिक गावाकडे केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: 50 thousand UP, Biharis out of Gujarat; After the rape of minor girl in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.