क्रूरता ! आईसमोरच 4 पिल्लांना जिवंत जाळलं  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:37 PM2018-11-07T16:37:06+5:302018-11-07T16:50:40+5:30

निष्पाप मुक्या जिवांवर पुन्हा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. प्राण्यांवर अत्याचार करणारा मानवतेचा क्रूर चेहरा समोर आला.

4 puppies burnt alive in front of mother in hyderabad | क्रूरता ! आईसमोरच 4 पिल्लांना जिवंत जाळलं  

क्रूरता ! आईसमोरच 4 पिल्लांना जिवंत जाळलं  

हैदराबाद - निष्पाप मुक्या जिवांवर पुन्हा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. प्राण्यांवर अत्याचार करणारा मानवतेचा क्रूर चेहरा समोर आला. हैदराबादमध्ये कुत्र्याच्या चार पिल्लांना जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या पिल्लांना इतक्या निदर्यीपणे का मारण्यात आले आणि कोणी मारले?, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपास आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

संतापजनक बाब म्हणजे या पिल्लांना त्यांच्या आईसमोरच जाळण्यात आले आहे. ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राणिमित्रांनी संपर्क साधला. प्राणिमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा यातील एक पिल्लू जिवंत असल्याचे त्यांना आढळले. प्राणिमित्रांनी तातडीनं त्या पिल्लाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचेपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

पिल्लांना जाळण्यात आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. 
दरम्यान, याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. 

Web Title: 4 puppies burnt alive in front of mother in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.