आॅक्सिजनअभावी ३० बालकांचा मृत्यू, यूपीतील घटना : पैशांसाठी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:50 AM2017-08-12T04:50:43+5:302017-08-12T04:50:48+5:30

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

30 children died due to oxygen, UP incidents: supply of money was stopped | आॅक्सिजनअभावी ३० बालकांचा मृत्यू, यूपीतील घटना : पैशांसाठी पुरवठा बंद

आॅक्सिजनअभावी ३० बालकांचा मृत्यू, यूपीतील घटना : पैशांसाठी पुरवठा बंद

Next

 गोरखपूर : गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यूपी सरकारने मात्र असे काही घडले नसल्याचा दावा केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रुग्णालय-कॉलेजला भेट देऊन पाहणी केली होती. कळस म्हणजे एवढी धक्कादायक घटना होऊन जिल्हाधिकारी किंवा कुणीही वरिष्ठ अधिकाºयाने तेथे भेट देऊन विचारपूसही केलेली नाही. तब्बल ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. लिक्विड आॅक्सिजन तर गुरुवारपासूनच बंद होता आणि शुक्रवारी तर सर्वच सिलिंडर संपले. काही बालकांना व रुग्णांना दोन तासांसाठी जम्बो सिलिंडर व अम्बू बॅगद्वारे आॅक्सिजन देण्यात आला. (वृत्तसंस्था)

बेजबाबदारपणाचा परिणाम

रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे बालकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी लिक्विड आॅक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यातून सुमारे ३०० रुग्णांना पाइपद्वारे आॅक्सिजन पुरवठा केला जात होता.

शुक्रवारी सकाळी आॅक्सिजन संपल्याने काही बालकांना अम्बू बॅग देण्यात आल्या. दुपारी १२ वाजता काही सिलिंडर पोहोचले; परंतु तरीही रुग्णालयात आॅक्सिजनची मोठी टंचाई जाणवत
आहे. तेथे एका वॉर्डमध्ये दीड तासासाठी १६ सिलिंडर लागतात.

पुरवठा सुरू, पण... पोहोचणार रविवारपर्यंत

इतकी बालके मरण पावल्यानंतर रुग्णालयाने पुरवठादाराचे २२ लाख रुपये भरण्याची तयारी सुरू केली व अखेर आॅक्सिनजचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला.

मात्र लिक्विड आॅक्सिजन पोहोचण्यास शनिवार किंवा रविवार उजाडणार आहे. यापूर्वीही याच रुग्णालयाचा ५० लाख रुपये वेळेत न भरल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.

Web Title: 30 children died due to oxygen, UP incidents: supply of money was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.