प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 11:47 AM2017-10-20T11:47:49+5:302017-10-20T11:49:06+5:30

भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे.

25 lakh people died in India due to pollution; Explain the information from a survey of 'Lancet' | प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

Next
ठळक मुद्दे भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. २०१५ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते. या आकडेवारीहून देशातील प्रदूषणाची समस्या किती भीषण आहे, ते समजतं आहे. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

वैद्यकीय नियतकालिक ‘लान्सेट’ने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला. यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेतला. हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर त्याचा परिणाम झाला, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे. यातूनही भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. २०१५ मध्ये भारतात, वायू प्रदूषणामुळे १८ लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला. तर जल प्रदूषण जवळपास ६ लाख लोकांनी जीव गमावला. 

मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. औद्योगिकरणात जलद गतीने वाढ होणाऱ्या भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या तितक्याच अती जास्त प्रमाणात वाढत असल्याचं ‘लान्सेट'ने आपल्या अहवालात म्हंटलं आहे. 

२०१५ मध्ये भारतात २५ लाख लोकांचा प्रदूषणामुळे झालेल्या आजारांमुळे मृत्यू झाला. यानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. हृदयाचे आजार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजाराने लोकांचा मृत्यू झाला आहे. 
लान्सेटच्या अभ्यासात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४०पेक्षा जास्त प्रसिद्ध लेखकांचा सहभाग होता. जगभरात वायू प्रदूषण सर्वाधिक जीवघेणं ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आलं. वायू प्रदूषणामुळे २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोकांनी जीव गमावला. तर जल प्रदूषणामुळे १८ लाख लोकांनी जीव गमावला.. याशिवाय कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला.

Web Title: 25 lakh people died in India due to pollution; Explain the information from a survey of 'Lancet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.