कर्नाटक: नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:40 PM2024-01-12T12:40:41+5:302024-01-12T12:41:04+5:30

कर्नाटकातील शासकीय निवासी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे.

  14-year-old Class IX girl in Karnataka's Chikkaballapura gives birth, police files case under POCSO | कर्नाटक: नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल

कर्नाटक: नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल

कर्नाटकातील शासकीय निवासी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे. अवघ्या १४ व्या वर्षी तरूणी आई बनल्याने एकच खळबळ माजली. विशेष बाब म्हणजे ती गरोदर असल्याची माहिती देखील कोणाला नव्हती. पोटात वेदना होऊ लागल्याने डॉक्टरांकडे नेली असता ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील ही घटना आहे. संबंधित तरूणीने एका मुलाला जन्म दिला असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय विद्यार्थिनी शासकीय शाळेच्या वसतिगृहात राहत होती. ती जेव्हा तिच्या घरी गेली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार केली तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिचे पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले जेथे स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे आढळले. 

गुन्हा दाखल
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी ९ जानेवारीला तिची प्रसूती केली. मुलीचे वजन कमी असले तरी तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने बाल कल्याण समितीला सांगितले की, तिच्या शाळेतील एका विद्यार्थ्याने तिला गर्भवती केले होते. पण नंतर तिने उघडपणे बोलणे टाळले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. विद्यार्थी आणि तिचे पालक उघडपणे बोलण्यास नकार देत आहेत. 

पीडित तरूणी तिच्या विधानावर ठाम नाही. तिने दुसऱ्या एका मुलाचे नावही सांगितले, जो तिच्या शाळेतील आहे. त्यामुळे जबाबदार कोण हे शोधण्यासाठी आम्ही या सर्वांची चौकशी करत आहोत. तुमाकुरू जिल्हा प्रशासनाने वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title:   14-year-old Class IX girl in Karnataka's Chikkaballapura gives birth, police files case under POCSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.