1 terrorist killed & 1 policeman injured in weapon snatching bid which was foiled by police in Anantnag | Jammu and Kashmir : अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
Jammu and Kashmir : अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलीस आणि दहशवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या चकमकीदरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या चकमकीत खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. अनंतनागमधील रानीपुरा परिसराला सुरक्षा दलानी घेराव घातला असून शोध मोहीम सुरू आहे. बंदिपुरा सेक्टरमध्ये याआधी 1 सप्टेंबरला तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. Web Title: 1 terrorist killed & 1 policeman injured in weapon snatching bid which was foiled by police in Anantnag
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.