जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी स्वखर्चातून केले रस्ते दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:43 PM2018-09-05T16:43:15+5:302018-09-05T16:43:34+5:30

लासलगाव : नाशिक जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांनी आपल्या मतदार संघातील बालाजीनगर, बारा बंगला रोड, रुक्मिणी नगर, साईबाबा नगर येथील खराब रस्त्यावर मुरूम आणि िखडी टाकून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Zilla Parishad member Jagtap rectified the roads done by self financing | जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी स्वखर्चातून केले रस्ते दुरुस्त

जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी स्वखर्चातून केले रस्ते दुरुस्त

Next
ठळक मुद्देया विधायक उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे.



लासलगाव : नाशिक जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांनी आपल्या मतदार संघातील बालाजीनगर, बारा बंगला रोड, रुक्मिणी नगर, साईबाबा नगर येथील खराब रस्त्यावर मुरूम आणि िखडी टाकून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या विधायक उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे. या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाश्यांना, वयोवृद्धांना तसेच विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी अडचणी येत होत्या. विशेषता पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खराब रस्त्यामुळे अनेकजण पडले होते. त्यामुळे या भागातील हे रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित होते. याकरीता जिल्हा परिषद सदस्य जगताप यांनी पुढाकार घेऊन स्व-खर्चातून या भागातील रस्त्याचे मुरमीकरण केले.
या वेळी जगताप यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, लासलगाव बाजार समितीच्या संचालिक सुवर्णा जगताप, कलावती जगताप, रंजना जगताप, शोभा उगले, मंगला धनाईत, हिराबाई हराळे, ज्योती दिंडोरकर, पूनम वर्मा, निलेश जगताप, योगेश जगताप, अतुल उगले, अरु ण जगताप, सचिन बकलीवाल, निलेश ब्रम्हेचा, शिवाजी हराळे, शाम शेख, अशोक पानगव्हाणे, मंगल पानगव्हाणे व रहिवाशी उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad member Jagtap rectified the roads done by self financing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.