श्रमदानातुन युवकांनी केली इतिहासकालीन बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 05:23 PM2019-03-12T17:23:49+5:302019-03-12T17:28:58+5:30

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.

Youths made history-time cleanliness | श्रमदानातुन युवकांनी केली इतिहासकालीन बारवची स्वच्छता

विहीरीची झालेली दु्रवस्था

Next
ठळक मुद्देदिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले.

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.
बागलाण तालुक्यापासुन १३ किमी अंतरावर असलेल्या वरदर शिवारात राणी आहिल्याबाई होळकर कालीन बऱ्याच विहीरींची कामे झाली आहेत. जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी या विहीरींची निर्मिती करण्यात आली होती.
विहीरींचे बांधकाम दगडांमध्ये असून पाणी भरण्यासाठी या बारवमध्ये उतरण्याकरीता पायऱ्यांची सोय करण्यात आली होती, पण काळाच्या ओघात हया इतिहास कालीन वास्तुंकडे, विहीरींकडे शासनाबरोबरच जनतेचा ही कानाडोळा होत गेला. दुर्लक्षीत झालेल्या या विहींरीची बºयाच भागात मरणप्राय अवस्था झाली आहे.
येथील वरदर शिवारातील विहीर देखील याला अपवाद नव्हती. संपूर्ण विहीर झाडाझुडपांनी व गवताने वेढली गेली होती. जवळ गेल्या नंतर सुध्दा येथे इतिहास कालीन विहीर असेल असे वाटत नव्हते. कंधाणेतील युवकांनी एकत्र येत या इतिहास कालीन विहीरीच्या पुर्नजीवन करण्याची संकल्पना मांडली, आणि सदर युवकांबरोबरच पालकांनी ही हातात कुºहाडी, कुदळ, पावडे, टोपली घेत तरूणांच्या खांदयाला खांदा लावुन दिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले आहे.
शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा हया विहीरींचे काम हाती घेवुन हया ऐतिहासिक वारसाचे संगोपण करण्याचा संकल्प हया तरूणांनी केला आहे. श्रमदानात शांताराम बिरारी, हिरामन मांडवडे, समाधान बिरारी, संदीप बिरारी, जगन मांडवडे, गिरीश मांडवडे, निशांत बिरारी, नितिन सूर्यवंशी, हयांनी सहभाग घेतला.
१) मित्रांनी एकत्र येत श्रमदानातुन या विहीरीची स्वच्छता केली आह.े बºयाच दिवसांपासुन पडीत असल्याने विहीर मातीने बुजली गेली आहे. शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्वच्छता करणार आहोत.
संदीप बिरारी, कंधाणे.
२) या भागात होळकर काळात जनतेच्या सेवेसाठी बºयाच विहींरीची निर्मिती करण्यात आल्याची नोंद आहे. पण काळाच्या ओघात दुर्लक्षीत या विहीरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक भागातील तरूणांनी श्रमदानातुन हा ठेवा जिंवत ठेवावा, असे वाटते.
डॉ. अभिमन बिरारी, प्राध्यापक, इतिहास संशोधक, कंधाणे.
 

Web Title: Youths made history-time cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास