नाशिकमध्ये कार उलटून युवक ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 12:30 AM2019-07-07T00:30:23+5:302019-07-07T00:30:58+5:30

कार मातोरी गावाजवळ असलेल्या कॅनालरोडच्या पुलाला धडकून उलटली.

youth killed in car accident, two injured | नाशिकमध्ये कार उलटून युवक ठार, दोन जखमी

नाशिकमध्ये कार उलटून युवक ठार, दोन जखमी

Next

नाशिक :  गिरणारे-मखमलाबाद रस्त्यावरून मखमलाबादकडे आपल्या कारने येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात अनिकेत राजेंद्र ढबाळे (30, रा. गुलमोहरनगर म्हसरूळ) याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत हा त्याच्या मित्रांसोबत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कारने येत असताना कार मातोरी गावाजवळ असलेल्या कॅनालरोडच्या पुलाला धडकून उलटली. या अपघातात अनिकेतच्या पायास व डोक्यास गंभीर मार लागला. त्यास त्याचा मित्र प्रवीण जाधव याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.  

या अपघातात विक्रम धुमने (26, रा. दरी) चेतन आत्माराम मोरे (26 रा. दरी) यांना जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सूर होते

Web Title: youth killed in car accident, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.