महातेजस उपक्र म राबविण्यात येवला तालुका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:33 PM2018-12-09T17:33:59+5:302018-12-09T17:34:15+5:30

येवला : येवला तालुक्यातील १८ केंद्रांसाठी ६ टॅग कॉर्डिनेटर ची नियुक्ती केली असून तालुक्यातील सर्व केंद्रात महातेजस उपक्र म पोहोचिवणारा येवला हा जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.

Yevala taluka tops implemented in Mahatejas | महातेजस उपक्र म राबविण्यात येवला तालुका अव्वल

महातेजस उपक्र म राबविण्यात येवला तालुका अव्वल

googlenewsNext

येवला : येवला तालुक्यातील १८ केंद्रांसाठी ६ टॅग कॉर्डिनेटर ची नियुक्ती केली असून तालुक्यातील सर्व केंद्रात महातेजस उपक्र म पोहोचिवणारा येवला हा जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.
येवला महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी तेजस हा उपक्र म नाशिक, नंदुरबार, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, बीड,गडचिरोली, हिंगोली व यवतमाळ या नऊ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला होता. सदर उपक्र म जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याने तेजस चे रूपांतर महातेजस मध्ये करून तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.
या उपक्र मासाठी शासनाची प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद ही शिखर संस्था असून संचालक डॉ. सुभाष कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यभरात विविध उपक्र म सुरू आहेत. महातेजस अंतर्गत प्रत्येक केंद्रासाठी एका टॅगची (टीचर्स अ‍ॅक्टिविटी ग्रूप) निर्मिती केली आहे. अशा तीन टॅगसाठी ब्रिटिश कौन्सिल मार्फत निवड केलेल्या एका टॅग कॉर्डिनेटर ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टॅग कॉर्डिनेटर यांना ब्रिटिश कौन्सिल व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद यांचे मार्फत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

Web Title: Yevala taluka tops implemented in Mahatejas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.